पालघर : मनोर ग्रामपंचायत हद्दीतील पाटील पाड्यात विषबाधा झाल्याने ग्रामस्थांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाव देवाच्या कार्यक्रमातील प्रसाद खाल्ल्याने ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची माहिती पुढे येत आहे. 36 रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने ग्रामस्थ आजारी पडल्याने देव कोपल्याची अंधश्रद्धा ग्रामस्थांमध्ये बळावली आहे.


गाव देव पूजनाच्या कार्यक्रमातील प्रसाद शुक्रवारी पाटील पाड्यातील प्रत्येक घरामध्ये वाटप केला गेला होता. प्रसाद खाल्ल्यानंतर ग्रामस्थांना उलटी आणि अतिसाराची लक्षणे जाणवू लागली होती. शनिवारी दुपारपर्यंत सुमारे अठ्ठावीस रुग्णांना मनोर मधील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात 16, नोबल हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी दोन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खाजगी रुग्णालयातील दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे. विषबाधेच्या कारणांची माहिती घेतली जात असून पाटील पाड्यात आरोग्य पथक तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी यांनी दिली.


विषबाधा झालेल्या रुग्णांची नावे
माही रूपेश वांगड,(बालिका) सिद्धी गिराणे (बालिका), पिंकी गीराणे,अविनाश घडपी, काश्या वांगड, रामजी वांगड, चांगुणा रघुनाथ धडपी, रुचीता गीराने(बालिका), ऋतिक दीलीप भोईर(बालक),छाया संदीप गोरखाना, सावीता,ममता महाले,अमित भवर, दिनेश खाचे, सायली साबला(बालिका), मयुर महेश महाले,मोहित महाले(बालक), दिपाली दिपक विराणे.


महत्त्वाच्या बातम्या :