मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 12 हजार 160 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1748 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने बारा हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज 68 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 68 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 578 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 259 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मागील नऊ दिवसातील रूग्ण संख्या
- 2 जानेवारी - 11, 877 रूग्ण
- 1 जानेवारी - 9,170 रूग्ण
- 31 डिसेंबर - 8067 रूग्ण
- 30 डिसेंबर - 5368 रूग्ण
- 29 डिसेंबर - 3900 रूग्ण
- 28 डिसेंबर – 2172 रूग्ण
- 27 डिसेंबर – 1426 रूग्ण
- 26 डिसेंबर – 1648 रूग्ण
- 25 डिसेंबर – 1485 रूग्ण
राज्यात आज 11 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 52 हजार 422 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 14 हजार 358 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.05 टक्के आहे. सध्या राज्यात 3 लाख 32 हजार 610 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1096 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 93 , 70, 095 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या 24 तासांत देशात 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद
गेल्या 24 तासांत देशात 33 हजार 750 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 123 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 45 हजार 582 झाली आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी बऱ्या होणाऱ्या रूग्णांचेही प्रमाण चांगले आहे. गेल्या 24 तासांत 10 हजार 846 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या 3 कोटी 42 लाख 95 हजार 407 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात 4 लाख 81 हजार 893 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आरोग्य विभागाच्या माहितीनुसार देशभरात आजपर्यंत 145 कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर? एकाच आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत 181 टक्क्यांनी वाढ
- Mumbai School : मुंबईत पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा 31जानेवारीपर्यंत बंद
- Mumbai Omicron cases: मुंबईतील कोरोनाबाधितांपैकी 80 टक्के रूग्ण ओमायक्रॉन बाधित, BMC आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांची माहिती