पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत तलासरी इथे सभा घेण्यात आली. या सभेसाठी दानवेंसोबत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार मनिषा चौधरी ,आमदार पास्कल धनारे उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधताना रावसाहेब दानवे यांनी चिंतामण वनगा यांच्या निधनाऐवजी विष्णू सावरांचं निधन असा उल्लेख केला. यानंतर उपस्थितांनी त्यांना चुकीची जाणीव करुन दिली. तरीही भाषणाच्या शेवटी सावरांचे कुटुंबीय तिकडे गेले तरी फरक पडणार नाही, असं ते म्हणाले.
श्रीनिवास वनगांचा अर्ज दाखल
दरम्यान, पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांना पक्षात घेऊन भाजप त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबत अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात लढाई रंगण्याची शक्यता आहे.
पालघरमधील भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर पोटनिवडणूक होत आहे. मात्र भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वनगा कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला आहे.
पाहा काय म्हणाले दानवे?