पालघर: जव्हार तालुक्यात एका 19 वर्षीय आदिवासी तरूणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. जव्हार तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. पोलिसांनी याबाबत मंगळवारी माहिती दिली. या तरूणीवर दोघांनी बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघा आरोपींनी आदिवासी तरूणीवर बलात्कार केला. जव्हार तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. जव्हार पोलिसांनी याबाबत मंगळवारी माहिती दिली. दोघा जणांनी रविवारी तरूणीवर बलात्कार केला. आरोपींनी तरूणीला शेतातील गोदामात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केले. बलात्कारानंतर आरोपींनी पीडित तरूणीला धमकावले. याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, जीवे मारू, अशी धमकी आरोपींनी तिला दिली.
आरोपींनी धमकावल्यानंतर पीडित तरूणी प्रचंड घाबरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेने याबाबत कुणालाही काहीही सांगितले नाही. मात्र, तिला या घटनेनंतर प्रचंड मानसिक धक्का बसला होता. पीडितेची अवस्था बघून कुटुंबियांनी तिच्याकडे विचारणा केली. त्यावेळी पीडितेने कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात सोमवारी आरोपींविरोधात कलम 376(2)(J),376(ड), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला.
अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसली तरीही या प्रकरणातील एका आरोपींन भीतीपोटी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली. तर दुसऱ्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली असून, लवकरच त्या आरोपीला अटक करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. मात्र या प्रकरणी पोलिसांनी कॅमेऱ्या समोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha