उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनिषा गिरी असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारल्यामुळे गिरी गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. शहरातील प्लस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मनिषा गिरी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र पोलीस दप्तरी मनिषा गिरी या पाय घसरून पडल्याची नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांकडून होत असलेल्या आरोपामुळे पोलिसांच्या हेतूवर संशय व्यक्त केला जात आहे.
शहरातील आंनदनगर पोलीस ठाण्यामध्ये काम करत असताना कामादरम्यान गिरी यांचा छळ होत असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. स्वतः गिरी यांनीदेखील काही दिवसांपूर्वी आपला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ होत असल्याची तक्रार पोलीस डायरीत केली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
गिरी यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉकटरांनी सांगितले की त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. तसेच पडल्याने अनेक ठिकाणी फॅक्चर झाले असल्याचे आहे.
महिला पोलीस अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, वरिष्ठांकडून छळ झाल्याचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 May 2019 08:36 PM (IST)
उस्मानाबाद शहरातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याने राहत्या घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यामध्ये ही अधिकारी महिला गंभीररित्या जखमी झाली असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -