मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजार रुपयांची नोटबंदी करुन काळापैसेवाल्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला. या नोटाबंदीनंतर देशभरात बँक आणि एटीएमबाहेर आजही रांगा लागल्या आहेत.
मोदींनी नोटबंदीचा निर्णय अचानक जाहीर केला असला, तरी त्याची तयारी अनेक महिन्यांपूर्वीच सुरु झाली होती. केवळ काळा पैसाच नव्हे तर नकली नोटांना आळा घालणं हा नोटाबंदी मागील भूमिका होती.
इंडियन एक्स्प्रेसच्या मते, मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला त्याआधी प्रचंड गुप्तता पाळली होती. केवळ सहा व्यक्तींनाच या निर्णयाची माहिती होती.
यामध्ये प्रिन्सिपल सेक्रेटरी नृपेंद्र मिश्रा, रिझर्व्ह बँकेचे माजी आणि आजी गव्हर्नर, अर्थ सचिव अशोक लवासा, शक्तीकांत दास आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचा समावेश होता, असं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
सूत्रांच्या मते या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया दोन महिन्यांपासून सुरु होती. मात्र ही योजना गुप्त राहाणं आवश्यक होतं. ती गुप्तता या सर्वांकडून पाळली गेली.
संबंधित बातम्या
8 नोव्हेंबरला नोटाबंदी करण्यामागील मोदींचं लॉजिक
नवी मुंबईत एक कोटी जप्त, सर्व नोटा एक हजारच्या
नोटबंदीचा निर्णय फसला तर देश खड्ड्यात जाईल : राज
नोटाबंदीनंतर कोट्यवधींची रोकड ठेवायची कुठे, सहकारी बँकांना प्रश्न
दुकानं, मॉल्समधल्या स्वाईप मशिन्समधूनही दोन हजार काढा
नोटाबंदीचे अकरा दिवस, 'चलनवेदना' किती दिवस?
छापखाना ते एटीएम, नोटेचा प्रवास कसा होतो?