नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील एकूण 942 अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी विविध पदके जाहीर केली. यामध्ये राज्यातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आठ शौर्य पदके, तीन राष्ट्रपती पोलीस पदके आणि 40 पोलीस पदके मिळाली आहेत.
राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांनाही पोलीस पदके जाहीर झाली आहेत. मुंबई येथील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेश्याम पांडे आणि नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांचा यामध्ये समावेश आहे.
राज्यातील या तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक
शिवाजी तुळशीराम बोडखे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर
दयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलीस निरीक्षक, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर, पुणे
बाळु प्रभाकर भवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, नियंत्रण कक्ष, नाशिक शहर
आठ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य पदक
शितलकुमार अनिल कुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक.
हर्षद बबन काळे, पोलीस उपनिरीक्षक.
प्रभाकर रंगाजी मडावी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल.
महेश दत्तु जाकेवार, पोलीस कॉन्स्टेबल.
अजितकुमार भगवान पाटील, पोलीस उपनिरीक्षक.
टिकाराम संपतराय काटेंगे, नायब पोलीस कॉन्सटेबल.
राजेंद्र श्रीराम तडमी , पोलीस कॉन्स्टेबल.
सोमनाथ श्रीमंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल.
याशिवाय 40 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस पदके मिळाली आहेत. तर चार तुरुंग कर्मचाऱ्यांना सुधारक सेवा पदक जाहीर झालं आहे.
राज्यातील 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस पदके जाहीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Aug 2018 08:47 PM (IST)
पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना आठ शौर्य पदके, तीन राष्ट्रपती पोलीस पदके आणि 40 पोलीस पदके जाहीर झाली आहेत. राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांनाही पोलीस पदके जाहीर झाली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -