Old Pune-Mumbai Highway Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर (Old Pune-Mumbai highway) खासगी बस(Private bus) दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या खासगी बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. हे सगळे प्रवासी झांज वादक आणि कलाकर होते. रात्री उशिरा कार्यक्रम आटपून गोरेगावला निघाले असता त्यांची खासगी बस दरीत कोसळली आणि त्यातील 11 जणांना मृत्यूने गाठलं तर इतर लोक गंभीर जखमी झाले आहेत. खाजगी बसमध्ये बाजी प्रभू वादक गट (झांज पथक) गोरेगावमधील (Mumbai) कलाकर प्रवासी होते. पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. त्यांना लगेच मदतकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीमने बाहेर काढले. यात 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
एमजीएम हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेल्या जखमींची नावे
1) आशिष विजय गुरव,19 वर्षे, दहिसर मुंबई2) यश अनंत सकपाळ, वय 17 वर्ष, गोरेगाव, मुंबई3) जयेश तुकाराम नरळकर, वय 24 वर्षे, कांदिवली, मुंबई4) वृषभ रवींद्र कोरमे, वय 14 वर्षे, गोरेगाव, मुंबई5) रुचिका सुनील डुमणे, वय 17 वर्षे, गोरेगाव, मुंबई6) आशिष विजय गुरव, वय 19 वर्ष, दहिसर, मुंबई7) ओंकार जितेंद्र पवार, वय 25 वर्षे खोपोली, रायगड8) संकेत चौधरी, वय 40 वर्ष,गोरेगाव, मुंबई9) रोशन शेलार, वय 35 वर्ष, मुंबई10) विशाल अशोक विश्वकर्मा, वय 23 वर्ष, गोरेगाव, मुंबई11) निखिल संजय पारकर, वय 18 वर्ष, मुंबई12) युसुफ मुनीर खान, वय 13 वर्ष, मुंबई 13) कोमल बाळकृष्ण चिले, वय 15 वर्ष, सांताक्रुज, मुंबई14) अभिजीत दत्तात्रेय जोशी वय 20 वर्षे, गोरेगाव मुंबई16) मोहक दिलीप सालप, वय 18 वर्षे, मुंबई17) दिपक विश्वकर्मा, वय 20 वर्ष, गोरेगाव, मुंबई18) सुरेश बाळाराम अरोमुक्कंम, वय 18 वर्ष, गोरेगाव, मुंबई
खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमधील जखमींची नावे
1) नम्रत रघुनाथ गावनुक, वय १८ वर्ष, गोरेगाव, मुंबई2) चंद्रकांत महादेव गुडेकर, वय 29 वर्ष, गोरेगाव, मुंबई3) तुषार चंद्रकांत गावडे, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई4) हर्ष अर्जुन फाळके, वय 19 वर्ष, विरार5) महेश हिरामण म्हात्रे, वय 20 वर्षे, गोरेगाव, मुंबई6) लवकुश रणजीत कुमार प्रजापति, वय 16 वर्ष, गोरेगाव, मुंबई7) शुभम सुभाष गुडेकर, वय 22 वर्षे, गोरेगाव, मुंबई 8) ओम मनीष कदम, वय 18 वर्ष, गोरेगाव, मुंबई9) मुसेफ मोईन खान,वय 21 वर्ष, गोरेगाव, मुंबई
खाजगी रुग्णालय जाकोटिया रुग्णालय खोपोली जखमीचे नाव
1) सनी ओमप्रकाश राघव, वय 21 वर्ष, खोपोली,रायगड.
खालापूर रुग्णालयात मयत नावे
1) जुई दीपक सावंत, वय 18 वर्ष, गोरेगाव, मुंबई
खासगी रुग्णालयाकडून लगेच मदत
अपघातानंतर लगेच बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. बचावकार्यात सहभागी झालेल्या हायकर्स आणि आयआरबी टीमने लगेच अनेक प्रवाशांना बाहेर काढलं. त्यावेळी जवळच्या अनेक खासगी रुग्णालयांना पाचारण करण्यात आलं होतं. या सगळ्यांनी प्रसंगावधान राखल्याने अनेकांचा जीव वाचला.
