Maharashtra Government Staff Strike : राज्यभरात सुरु असलेल्या जुन्या पेन्शनच्या (Old Pension Scheme) संपासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली आहे. संप (Strike) करणाऱ्यांच्या मागण्या रास्त असू शकतात, मात्र हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) हे तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करणार आहेत.


विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला


जुन्या पेन्शनसाठी गेल्या तीन दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. अशातच आता जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा आता हायकोर्टात गेला आहे. विद्यार्थी आणि रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचा दाखला देत हा संप बेदायदेशीर असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


आज संपाचा तिसरा दिवस


सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा तिसरा दिवस आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर कालपासून मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईला सुुरुवात झाली. याचं कारण म्हणजे राज्य सरकारने जरी अभ्यास समिती गठित करण्याचा निर्णय जाहीर केला असला, तरी तो समन्वय समितीला मान्य नाही. मात्र यामुळे सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तर सरकारी कार्यालयातील कामकाज ठप्प झालं आहे. तर दुसरीकडे दहावी बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत जरी सुरु असल्या तरी पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावी बोर्डाचा निकालास विलंब होऊ शकतो. 


महत्त्वाच्या बातम्या:


Old Pension Strike : जुन्या पेन्शन योजने संदर्भात स्थापन केलेली अभ्यास समिती सरकारी कर्मचारी संघटनांना मान्य नाही : विश्वास काटकर