इंदापूर (पुणे) : इंदापूर येथील ओबीसी मेळाव्यातून पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी काही बोललो की, काही विद्वान लोक बोलायला लागतात की दोन जातीत भांडणे लागत आहेत. जरांगे यांच्या सभा रात्री उशिरा चालते, पोलीस कारवाई करीत नाही. कायदा फक्त आपल्याला त्यांना नाही. मी 15 दिवसांनी एकदा बोलतो, सौ सुनार की एक लोहार... काही बोलावे लागते, सगळंच ऐकून घ्यायची सवय नाही.  राज्यात अशांतता निर्माण कोण करते? असे भुजबळ म्हणाले. 


राज्यात कायदा सुव्यवस्था आहे की, नाही कायदा सुव्यवस्था संभाळण्याची जबाबदारी कुणाची? असा प्रश्न उपस्थित केला.  जालना यथे महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला. मग पोलिसांनी लाठीचार्ज केला असे मी अनेक दिवसांपासून सांगतोय. पण कोणीच काही बोलायला तयार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सभागृहात लेखी उत्तर दिले आणि ज्यात त्यांनी 79 पोलीस जखमी झाल्याचे म्हटले आहे. बचाव करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यात 50 जण जखमी झाले. हे आधीच समोर यायला पाहिजे होते. हे आता समोर आल्याचे भुजबळ म्हणाले. 


टी.पी. मुंडेंच्या घोषणेने नवा वाद?


इंदापूरमधील ओबीसी सभेतून टी.पी. मुंडेंच्या घोषणेने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण जरांगे यांच्यावर टीका करतांना, 'कोण आला रे कोण आला जरांगेचा बाप आला' अशी घोषणा मुंडे यांनी दिली आहे. यापूर्वी देखील मुंडे यांनी ओबीसी मेळाव्यात बोलतांना जरांगे यांच्यावर जहरी टीका केली होती. दरम्यान, आजच्या सभेत त्यांनी अशाचप्रकारे जरांगे यांच्यावर टीका केली आहे. तसेच,  दोस्ती भुजबळ साहब  के साथ होती है, जरांगे सारख्या गद्दारी करणे वालो से नही होती, असेही मुंडे म्हणाले. 


'त्या' आमदारांना मातीत गाडू: लक्ष्मण गायकवाड 


यावेळी बोलतांना लक्ष्मण गायकवाड म्हणाले की,"मराठा कुठल्या अंगाने मागासवर्गी आहे. आता मराठ्यांना गाजर देणार. नाशिकमध्ये भुजबळ साहेब असताना रस्त्यावर गोमूत्र शिंपडून रस्ता स्वच्छ करण्यात आला. पण, भुजबळ साहेब आमच्या गळ्यातील ताईत आहेत. जर त्यांना हात लावला तर तुम्हाला मूX पाजू असे गायकवाड म्हणाले. जिथे जरांगे पाटील सभा घेतील, तिथला मराठा आमदार पडला म्हणून समजा. जो मराठा समाजाचा आमदार जातीसाठी माती खाईल, त्याला आपण मातीत गाडू, असे गायकवाड म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


OBC Sabha : ज्या मैदानावर जरांगेंची सभा झाली, त्याच मैदानावर आज भुजबळांची तोफ धडाडणार