नागपूर : भाजप नेते आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी आरक्षणाच्या याचिकेत आज सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाला 3 महिने निवडणूक घेण्यापासून थांबवण्याचे आदेश द्यावे अशी मागणी ते करणार असून, ही  माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांशी नागपुरात बोलताना दिली. तसेच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ हे सतत समता परिषदेला पुढे करून नाटक करत असल्याचा ही आरोप त्यांनी केला.


भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी केसमध्ये इंटरव्हेन्शन करणार. सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने 3 महिन्याचे कमिटमेंट दिले आहे. यात राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने थांबवाबे आणि 3 महिने वेळ द्यायला सांगावं. राज्य निवडणूक आयोगाला दिलेले पत्र माघारी घेण्याचा आदेश कोर्टाने द्यावा.


छगन भुजबळांवर टीका
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळांवर टीका केली. छगन भुजबळ सतत समता परिषदेला पुढे करून नाटक करत आहेत, त्यांना हे शोभत नाही. प्रकाश आंबेडकरांचेही चुकते आहे. प्रश्न एका समाजाचा नाही. कुठल्या ही समाजाचे नाव घेणे योग्य नाही. हा धनदांडग्यांना फायदा पोहचवण्याचा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर राज्य सरकारची भुमिका संशयास्पद आहे. तरी उशिरा शहाणपण सुचलं असे म्हणू. तीन महिन्याचा वेळ मागितला आहे. 


राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घेऊन गंभीरच नव्हते, त्यामुळे आरक्षणाचा फुटबॉल झाला असा आरोपही त्यांनी केला आहे. ओबीसी इम्पेरीकल डाटा मिळेपर्यंत राज्यातील निवडणुका लावू नये अशी मागणी त्यांनी केली. 


महत्त्वाच्या बातम्या :