OBC leader Laxman Hake : ओबीसी आरक्षण बचावसाठी (OBC Resrvation) आजपासून अंतरवाली सराटी (Antarwali Sarathi) येथे आमरण उपोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या लक्ष्मण हाके यांना (OBC leader Laxman Hake) पोलिसांनी नोटीस दिली आहे. मराठा व ओबीसी यांच्यात वाद होऊ नये म्हणून पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आबे. लक्ष्मण हाके आपल्या आंदोलनावर ठाम असून सकाळी अंबड कडे बैठकीसाठी रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.  ओबीसी आरक्षणाच्या (OBC Resrvation) रक्षणासाठी लक्ष्मण हाके हे प्राणांतिक उपोषणाला बसणार आहेत, त्यासाठी अंबड येथे बैठक पार पडणार आहे. 


 8 जूनपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. कुणबी नोंदी (Kunbi Maratha) असलेल्या मराठा बांधवांना सगेसोयऱ्यांच्या व्याखेत बसणारे आरक्षणही लागू व्हावे, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यातील ओबीसी समाजही आक्रमक होण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनीही आंतरवाली सराटीत प्राणांतिक उपोषण करण्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी ते अंबड येथे बैठक घेणार आहेत.  


बैठकीसाठी लक्ष्मण हाके अंबडला रवाना -


अंतरवली सराटी येथे आमरण उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बार्शी पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलं, ओबीसीच्या बैठकीसाठी लक्ष्मण हाके अंबडला रवाना झाले आहेत. अंबड पोलीसांनी लक्ष्मण हाकेंना 149 ची नोटीस दिली आहे. अंतरवालीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनाची हाक दिलीय. आज सकाळी 10 वाजता हाके यांची अंबड येथे बैठक आहे . बार्शीत असलेले हाके पोलीस पथकासोबत सकाळी अंबडकडे निघाले आहेत. अंतरवालीतील आंदोलनाबाबत लक्ष्मण हाके आज  निर्णय घेणार आहेत. दरम्यान, काल रात्री दीड वाजेपर्यंत बार्शी पोलीस ठाण्यात त्यांना थांबवण्यात आले होते . 


आंदोलनाबाबत निर्णय घेणार - 


मराठा व ओबीसी यांच्यात वाद होऊ नये म्हणून पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता सांगोला पोलीस हाके याना ताब्यात घेण्यासाठी निघाले आहेत. जालना पोलीसही बार्शीमध्ये तळ ठोकून होते. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देवून हाके याना नोटीस दिली आहे. आता हाके अंबडकडे रवाना झाले आहेत, अंतरवालीतील आंदोलनाबाबत ते आज  निर्णय घेणार आहेत. 


आणखी वाचा :


Maratha Reservation: अंतरवालीत आमने-सामने; ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाकेंचंही मनोज जरांगेंच्या सराटीत 'आमरण उपोषण'