मुंबई : लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Eelection) संपताच आता मराठा आंदोलनासाठी (Maratha Reservation) झगडणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास सुरुवात केली आहे. उपोषणाचा त्यांचा आजचा दिसरा दिवस आहे. त्यांच्या या उपोषणामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला लागले आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांनी 'उमेदवारांना पाडा, निवडणुकीत उभे राहण्यापेक्षा उमेदवारांना पाडा' असे आवाहन मराठा समाजाला केले होते. त्याचा परिणाम मराठवाड्यात जाणवला. दरम्यान, जरांगे यांच्या याच उपोषणाच्या भूमिकेवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे (Babanrao Taywade) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे यांनी आपली शक्ती दाखवावी. त्यांनी स्वत:ची माणसे निवडून आणावीत, असे तायवाडे म्हणाले आहेत.


....तर मराठा समाजाचे प्रश्न निकाली निघतील


"जरांगे यांनी याला-त्याला पाडण्यापेक्षा आपली माणसे निवडून आणण्याचे त्यांनी काम करावे. आपली शक्ती दाखवावी. आपल्या विचारसरणीचे लोक विधानसभेत निवडून आणले तर मराठा समाजाचे प्रश्न निकाली निघतील. सगे सोयऱ्यांच्या अधिसूचनेवर सहा हजारापेक्षा अधिक आक्षेप आले आहेत. या हस्तक्षेपांचं निराकरण झाल्यावर अंतिम अधिसूचना काढण्यात येईल असे सरकारचे म्हणणे होते. पण जरांगे यांचे म्हणणे बरोबर आहे, कारण खूप वेळ झालाय, असे महती तायवाडे यांनी नोंदवले.


मनोज जरांगे लढवय्ये, प्रकृतीकडे लक्ष द्यावे


सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी किती वेळ लागेल याबाबत सरकारने चर्चा करावी आणि मार्ग काढावा. मनोज जरांगे यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रकृती चांगली असेल तरच लढू ते हा लढू शकतील. म्हणूनच जरांगे यांनी यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. जरांगे लढवय्ये आहेत, असेही तायवाडे म्हणाले.


"आम्ही जरांगे यांचा विरोध करत नाही, गैरसमज करू नये"


मोठ्या प्रमाणात जनतेचे बळ मिळाले की राजकीय आकांक्षा निर्माण होतात. याला-त्याला पाडण्यापेक्षा आपली माणसे निवडून आणण्याचे त्यांनी काम करावे. त्यांना नेमके कुणाचे उमेदवार पाडायचे आहेत? ते कधी काँग्रेसचे तर कधी भाजपचे उमेदवार पाडा म्हणतात. आम्ही ओबीसीसाठी, आमच्या संवैधानिक अधिकारांसाठी संघर्ष करतो. आम्ही जरांगे यांचा विरोध करत नाहीत. त्यांनी गैरसमज करू नये. यापुढे आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा :


Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा; आरक्षण 16 टक्के आणि ओबीसीमधूनच घेण्याचा निर्धार


मनोज जरांगे पाटलांबाबत वादग्रस्त वक्तव्य, बीडमध्ये मराठा समाज रस्त्यावर