Beed Maratha Reservation : बीडमध्ये (Beed) मराठा (Maratha) समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांच्या समर्थनार्थ  मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु आहे. 

Continues below advertisement

पोलीस अधीक्षक कार्यालयावर मराठा समाजाचा मोर्चा

बीडमध्ये समस्त मराठा समाज आज रस्त्यावर उतरला आहे. काल पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ शिरुर तालुका बंदची हाक देण्यात आली होती. याच दरम्यान झालेल्या भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांनी मनोज जरांगे पाटील यांना अनुसरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याचाच निषेध म्हणून आज मराठा समाज आक्रमक झाला आहे. शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसर ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर मराठा बांधवांनी मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी केलीय. लोकसभेचा निकाल लागल्यानंतर सध्या जिल्ह्यात सोशल वॉर रंगला असून, दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झालीय. अशातच पोलिसांचा या सर्व परिस्थितीवर वॉच असून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे. हे सोशल वॉर अद्याप थांबलेलं नाही. 

पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ परळी बंदची

आज पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ परळी बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे बीडमध्ये मराठा समाजाने रस्त्यावर उतरत जरांगे पाटील यांचं समर्थन केलं आहे. दशरथ वनवे यांनी केलेले विधान हे आक्षेपार्ह असून, त्यांनी समस्त मराठा समाजाची माफी मागावी तसेच त्यांना अटक करावी अशी मागणी शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केली आहे.

Continues below advertisement

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  पुन्हा एकदा उपोषण सुरु केलं आहे. आज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान उपोषण स्थळी अद्याप सरकारच्या वतीनं कोणीही आलं नसल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय. तर यावेळी बोलतना त्यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde)  जोरदार निशाणा साधलाय. जो मराठा समाजाला त्रास देईल त्या नेत्याला विधानसभेत पाडणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. ते जालन्यात माध्यमांशी बोलत होते. 

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange Video: ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार, धनंजय मुंडेंचं नाव न घेता मनोज जरांगेंचा इशारा