सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळात कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले तीन दिवस कोकणच्या दौऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आहेत. आज ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व वेंगुर्ले तालुक्यातील काही गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंत्यत दुर्गम भागात सुध्दा जिल्ह्यातील खासदार, आमदारांसह पाहणी केली. कोकणात घराचं मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या वादळामुळे फळबागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजुनही अनेक गावांत विद्युत पुरवठा खंडित आहे. जवळपास तीन लाख घरांच्या कनेक्शन पैकी दोन लाख लोकांची वीज कनेक्शन जोडले गेले आहेत.  एक निश्चित आहे, फार मोठी कॅज्युलेटी अद्याप झालेली नाही. वादळाच्या पूर्वी अलर्ट केलं होतं. त्यासंदर्भात बैठक मी आणि मुख्यमंत्री यांच्यात झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन सर्व मच्छिमारांना समुद्रातून सुरक्षित आणलं. 4 लोकांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. नुकसान प्रचंड आहे. महाविकास आघाडीचे माजी मंत्री, खासदार आम्ही सर्व या भागाची पाहणी करत आहोत. 


विजय वडेट्टीवार  म्हणाले,  सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा आता घेतला मात्र यामध्ये शेतीच्या पंचनाम्यांना थोडा उशीर होत आहे. कारण नुकसान खूप मोठं आहे. घराचं नुकसान झालेलं आहे त्यात बरेच पंचनामे झालेले आहेत. साधारणपणे 10 हजार घरांची अंशतः आणि 28 घर पुर्णतः कोसळलेली आहेत. शेतीतही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे साधारणपणे 6 हजार हेक्टरच नुकसान झालेलं आहे. कोकणात 27 बोटीचं पुर्णतः नुकसान झालेलं आहे. त्यासोबत पोल्ट्री, रिसॉट, पर्यटन व्यवसाय यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांना सुध्दा मदत करण्याची अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. सर्वसमावेशक मार्ग काढून वादळात नुकसान झालेल्याना मदत करू.


निसर्ग चक्रीवादळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा तडाखा नव्हता. मात्र रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे निकष बदलून त्यावेळी मदत करण्यात आली होती. तेव्हा 784 कोटी रुपयांची मदत या कोकणी लोकांना दिलासा देण्याचं काम केलं. 100%  मदत तर कुठलही सरकार करू शकत नाही. त्यावेळी केंद्र सरकारला 1070 कोटींचा राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला होता. मात्र केवळ 274 कोटी रुपये राज्य सरकारला दिले. उर्वरित सर्व पैसे महाविकास आघाडीच्या सरकारने कोव्हिडंच संकट मोठं असताना देखील आणि आर्थिक अडचणीत असताना सुध्दा कोकणाच्या पाठीमागे उभं राहून मदत देण्याचं काम केलं, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. 


निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी पुर्णतः घर कोसळल्यावर दीड लाख रुपयांची मदत केली होती तोच निकष यावेळी मदत करू.18 हजार हेक्टर फळबागांना नियम असताना त्यावेळी 50 हजार रुपये दिले. आतापर्यंत कोकणात 3 मच्छीमारांचा मृत्यू झाला त्यातील दोघांना 4 लाख प्रत्येकी मदत केली. एक मच्छीमार अजूनही बेपत्ता आहे. मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर या पुढच्या कॅबिनेट मध्ये या निकषांची चर्चा होईल. अधिकाअधिक मदत कोकणातील लोक नाराज होणार नाही आणि नाराजी होऊ देणार नाही अश्या प्रकारची मदत करायचा निर्धार महाविकास आघाडी सरकारने केला आहे. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात अद्याप सविस्तर पंचनामे झालेले नाहीत. केवळ 30 टक्के पंचनामे झाले आहेत. त्यामुळे नुकसानीचा अंदाज काढणं आता कठीण आहे. त्यामुळे ती व्याप्ती मोठी असू शकते. आज किती कोटींच नुकसान झालं हे म्हणण्यापेक्षा पुर्णतः पंचनामे झाल्यानंतर आपण त्याचा अंदाज वर्तवू आणि ती मदत करू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही विभागाच काम समाधानकारक दिसलं नाही. विशेष करून कृषी विभाग फार वेळ काढूपणा आणि ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते दिसत नाही. एक दिवस उशीर झाला पंचनाम्यांना तरी चालेल. मात्र पुढच्या दोन चार दिवसात पंचनामे झाले तरी चालतील. प्रत्येक व्यक्तीच नुकसान झालं त्याचे पंचनामे झालेच पाहिजे. नुकसानग्रस्त माणसाला व्याय मिळाला पाहीजे. त्याला मदत मिळाली पाहीजे ही आमची भूमिका आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 


कोणी वेळकाढूपणा करत असेल तर त्याच्यावर कारवाई करू ज्यांनी कामाची जबाबदारी नीट करणार नसेल तर. सर्व पंचनामे व्यवस्थित झाल्यानंतर पुर्णतः मदत करू. ज्यांचं नुकसान झालं आहे त्याना पुर्णतः नुकसान भरपाई कोणतेही सरकार करू शकत नाही. परंतु दिलासा देऊन त्यांना पूर्ववत उभं कस करता येईल ही भूमिका शासन म्हणून पार पाडावी लागते. ती भूमिका नक्की पार पाडू. 


कोकणात काही ठिकाणी धूपप्रतिबंधात्मक बंधारे कोसल्यामुळे वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी आलं. भविष्यात मोठया प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केरळच्या धर्तीवर धुपप्रतितात्मक बंधारे बांधण्याची आवश्यक आहे. यामुळे साधारणपणे 400 ते 500 कोटी रुपये लागतील. मुख्यमंत्र्यांसोबत याची तातडीची बैठक लावू, आणि हा निधी कोकणाला देऊ. जे वैभव कोकणाचं आहे. जो निसर्ग आहे कोकणचा आणी निसर्गाच्या भरवशावर जी गाव आहेत. ती जर गाव नष्ट होत असतील तर कोकणाच निसर्ग नष्ट होईल म्हणून ही उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे.


केंद्र सरकारला आणि विनंती अर्ज केलेला आहे. केंद्राच पाहणी पथक कोकणात तातडीने येऊन पाहणी करून आम्हाला मदत करा. यात कोकणंच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मला अपेक्षा आहे पंतप्रधानाकडून की ते तातडीने पथक पाठवून मदत करतील.  कोकणात पुढच्या 8 दिवसात प्रत्यक्षात मदत होईल. पुनर्वसनाच्या संदर्भात सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्याना देणार जेणेकरून हेलपाटे मारून वेळ जातो त्यांना तातडीने मदत होईल, विजय वडेट्टीवार  म्हणाले.