ठाणे : ठाणे शहरातील तहसीलदार कार्यालयात नागरी सुविधा केंद्राचा वीज पुरवठा मागील  काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. 85 हजारांचे वीज बिल थकवल्यामुळे सेतू केंद्राची वीज खंडीत करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास होत आहे.

अनेकदा हेलपाटे मारूनही कधी वीज नाही तर कधी सर्व्हर बंद असल्यामुळे नागरी सुवीधा केंद्राचे नागरी असुविधा केंद्र झाले आहे. प्रशासनाकडे याची विचारणा केली असता, यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले.

आतापर्यंत हजारो नागरिकांचे हाल झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्यांच्या प्रश्न उभा राहिलाय तर अनेकांना अॅडमिशनसाठी अडथळे येत आहेत.

आता नेहमीच्या या भोंगळ कारभाराला नागरिकांनी चांगला धडा शिकवायचे ठरवले आहे. यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नागरीकांनी दिला.

गुजरात येथील एका खासगी कंपनीला या सेतूचे कंत्राटी काम देण्यात आले आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार असल्याचे नागरिक सांगत आहेत.