नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपात आले तर मी त्यांचं स्वागतच करेन, असं विधान भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं. नवी मुंबईतील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


"गणेश नाईक यांचं मी त्यांची आरती घेऊन स्वागत करेन. यापूर्वी मीच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन गेले होते. मात्र राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांनी मलाच दगाफटका केला होता. पण तरीही मी त्यांच्या भाजप प्रवेशासाठी तयार आहे," असं मंदा म्हात्रे म्हणाल्या.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचा गड खालसा होण्याची चर्चा रंगली होती. माजी मंत्री गणेश नाईक हे सहकुटुंब भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आता मंदा म्हात्रे यांच्या विधानानंतर नाईक कुटुंबाच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

पाहा व्हिडीओ