Nitin Gadkari : विदर्भातील (Vidarbha) सर्व जिल्ह्यांमध्ये दूध संकलन वाढण्यासाठी (increase milk collection) विद्यापीठ आणि संशोधन संस्थांनी नव संशोधनाद्वारे पुढाकार घ्यावा असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं. ते नागपुरात बोलत होते. विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील दूध संकलन हे प्रतिदिवशी 5 लाख लिटर आहे. हे संकलन पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली यांच्या तुलनेत खूपच कमी असल्याचे गडकरी म्हणाले. 


विदर्भात किमान 20 लीटर प्रतिदिन दूध देणाऱ्या 10 हजाराच्यावर पशुधन विकसित करावे 


विदर्भात दुधाचे संकलन वाढवण्यासाठी, महाराष्ट्र पशु विज्ञान आणि मत्स विज्ञान विद्यापीठ - माफसू तसेच अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी ‘काऊ फार्म्स’ निर्माण करून देशी वाणाच्या गायींचे ‘इम्ब्रीयो ट्रान्सफरच्या माध्यमातून शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये खाजगी सार्वजनिक भागीदारी-  पीपीपी प्रारूपाच्या आधारे पशुवैद्यकीय तंत्रज्ञांच्या मदत घ्यावी. यांच्या मदतीनं विदर्भात किमान 20 लीटर प्रतिदिन दूध देणाऱ्या 10 हजाराच्यावर पशुधन विकसित करावे असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले. नागपूरच्या सेमिनरी हिल्स येथील माफ्सूच्या सभागृहात इंडियन डेअरी असोसिएशन वतीने आयोजित दुग्ध व्यवसायावरील राष्ट्रीय परिषदेत ते आज संबोधित करत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील ,भारतीय कृषी विज्ञान परिषदेचे उपमहासंचालक डॉ. राघवेंद्र भट, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डचे अध्यक्ष मिनेश शहा, इंडियन डेअरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आर एस सोधी  उपस्थित होते.


विदर्भाच्या 11 जिल्ह्याच्या 3 हजार गावांमधून प्रतिदिन 5 लाख लिटर दुधाचं संकलन 


विद्यापीठ आणि संशोधन संस्थानी  तंत्रज्ञानाचा वापर हा तळागाळापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. सिद्ध झालेलं तंत्रज्ञान, त्याची आर्थिक व्यवहारिता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि अंतिम उत्पादनाचे  उत्तम विपणन या गोष्टीवर भर देऊन दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचा प्रयत्न डेअरी व्यवसायाशी तसेच डेअरी संशोधनाशी संबंधित संस्थांनी करावा, असे देखील गडकरी यांनी यावेळी नमूद केले.


नागपूरच्या बुटीबोरीत 6 लाख लिटर प्रति दिवस क्षमतेचा दुध प्रक्रिया प्रकल्प सुरु होणार


एनडीडीबीच्या प्रकल्पाद्वारे विदर्भाच्या 11 जिल्ह्याच्या 3 हजार गावांमधून 5  लाख लिटर प्रति दिवस दूध संकलन होत आहे. नागपूरच्या बुटीबोरी  येथे  6 लाख लिटर प्रति दिवस क्षमतेचा दुध  प्रक्रिया प्रकल्पासाठी जमीन मिळाली असून या प्रकल्पाची क्षमता 10 लाख प्रति लिटर प्रति दिवस  करण्याचा मानस असल्याचे मत एनडीडीबीचे अध्यक्ष मिनिश शहा यांनी व्यक्त केले. पुढील वर्षापासून या प्रकल्पाचे संचालन होणार असून या माध्यमातून पनीर, दही, मिठाईचे उत्पादन होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  या कार्यक्रमाप्रसंगी सर्वश्रेष्ठ डेअरी प्लांटचा पुरस्कार हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संस्थेला मिळाला तर उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार  मनाली रेडेकर यांना मिळाला. याप्रसंगी गडकरींच्या हस्ते माफ्सू  वार्ता तसेच विद्यापीठाच्या संशोधनाची माहिती असलेल्या घडी पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. काही तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच  संशोधन संस्थाअंतर्गत  सामंजस्य करारावर देखील गडकरींच्या उपस्थितीत याप्रसंगी स्वाक्षऱ्या  करण्यात आल्या. या परिषदेमध्ये  माफसूचे अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी,  डेअरी व्यवसायाशी संबंधित व्यावसायिक, तंत्रज्ञ आणि  शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


महत्वाच्या बातम्या:


Ajit Pawar : दुधात भेसळ करणाऱ्यांवर मोक्का लावणार , अजित पवारांची भर सभेत तंबी