Nitin Gadkari : आम्ही एकनाथ शिंदे यांना असं अमृत पाजलं आहे की त्यांची गाडी आता सुसाट जाईल. बुलेट ट्रेनच्याही पुढे जाईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील 'संकल्प से सिद्धी' परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. या परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आपल्याला गुंतवणूक आणखी वाढवावी लागणार आहे. सीआयआयनं एग्रीकल्चरल ग्रोथ रेटवर लक्ष द्यावं. जंगल पर्यटनावर लक्ष द्यावं. त्यामुळे आदिवासी ग्रोथ रेट बनवण्यात मदत होईल. तसेच जे प्रोजेक्ट अर्धवट आहे ते पूर्ण करावे. सिंचनाला पाणी द्या, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला पाणी द्या. आत्मनिर्भर बनवण्याचा मोदींचा विचार आहे.


इनोव्हेशनमध्ये आपण आघाडीवर आहोत, आपण देशाला मार्गदर्शन करु शकतो. मागील आठ वर्षांमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. आठ वर्षाआधी काय झालं होते, ते आता मी बोलणार नाही. आपण देशाला आर्थिक घटकांवर आघाडीवर नेऊ शकतो, असे नितीन गडकरी म्हणाले. नागपूर- हैद्राबाद महामार्गाबाबत विचार सुरु आहे, असेही यावेळी गडकरी यांनी सांगितले. 


इथेनॉलच्या बरोबरीने पेट्रोलचं ॲव्हरेज देखील होईल. त्यामुळे ग्राहकांचा फायदा होईल.  ईव्ही होणार नाही असं म्हणत होते, मात्र आता वेटिंग आहे. माझ्याकडेही हायड्रोजनची गाडी आहे. आपण हायड्रोजन मिशन आणल आहे. बायो सीएनसी, एलएनजी यवतमाळ जिल्ह्यात बनवत आहोत.  महाराष्ट्र भूमिका घेईल तर गोष्टी बदलतील. 65 प्रोजेक्ट मी बनवत आहे, यातील काही महाराष्ट्रात आहेत, असे गडकरी यांनी यावेळ सांगितलेय. नवी मुंबई ते नवीन विमानतळापर्यंत आपण १७ मिनिटात रो-वेनं पोहोचू असा एक प्रकल्प असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सप्ष्ट केले.



महाराष्ट्र सगळ्याच बाबतील अग्रेसर आहे. सेवा, कृषी, GDP मध्ये आपलं राज्य पुढे आहे. MSRDC ने अनेक रस्ते बनवले आहेत.  MSRDC 1650 कोटी मध्ये पूर्ण केले आहे. देवेंद्र फडणवीस जेव्हा मंत्री झाले तेव्हा समृद्धी महामार्ग बनवला, राज्याला अधिक समृद्धी हा महामार्ग मिळवून देईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.


 


मुंबई- दिल्ली पोहचवणारा हाय वे बनवला जात आहे. बांद्रा- वरळी सी लिंक वसई विरारपर्यंत नेण्याचा मानस होता. मुंबई- बेंगलोर हाय-वे साडेसहा तासात पोहचू असा हाय-वे तयार केला जाईल. पुणे- औरंगाबाद 2 तासात पार पडेल असे हाय वे बनवणार आहे, असे नितीन गडकरी यांनी सांगितले.