मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याचा रायगड दौरा रद्द करण्यात आला आहे. मुंबई आणि अलिबागमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उद्याचा दौरा रद्द करण्यात आला आहे. रायडगडमधील चौल, बोर्ली, मुरुड येथे निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना त्यांच्या हस्ते मदत साहित्य आणि अनुदान वाटप केले जाणार होतं. मुख्यमंत्री चौल येथे जाऊन ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेणार होते.


याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 5 जून रोजी अलिबागमध्ये जाऊन नुकसानीचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी चक्रीवादळग्रस्तांना तातडीने 100 कोटीच्या मदतीची घोषणा केली होती.


निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना सरकारने जाहीर केलेली मदत


निसर्ग चक्रीवादळामुळे पक्क्या घराचं पूर्णत: नुकसान झालेल्या कुटुंबांना सुधारित दरांनुसार दीड लाख रुपये मदत मिळेल. पक्क्या किंवा कच्च्या घरांचं अंशत: (किमान 15 टक्के) नुकसान झालेल्या कुटुंबांना 15 हजार रुपये मिळतील. नष्ट झालेल्या झोपडीसाठी 15 हजार रुपये मदत मिळेल. घर पूर्णत: कोसळलेल्या कुटुंबांना कपडे व भांड्यांच्या खर्चासाठी प्रत्येकी 5 हजार प्रमाणे एकूण 10 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त दुकानमालक व टपरीचालकांना नुकसानीच्या 75 टक्के मर्यादेत कमाल 10 हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी 50 हजार रुपयांप्रमाणे कमाल दोन हेक्टरसाठी मदत मिळणार आहे. नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी कुटुंबे निश्चित करण्यात येतील. त्यानंतर मदतीची रक्कम संबंधीत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.


निसर्ग चक्रीवादळ बाधितांना मदतीची घोषणा; घरांसाठी दीड लाखाची, तर शेतीसाठी हेक्टरी 50 हजारांची मदत


 CM Thackeray-Fadnavis meet | कोकण दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला