NIA Raid : एनआयएची आयसीसवर मोठी कारवाई, देशभरात 44 ठिकाणांवर एनआयएचं धाडसत्र
आयसीसशी संबंधांच्या (ISIS Conspiracy Case) आरोपांवरून एनआयएने ठाणे जिल्ह्यासह (Thane NIA Raid) देशात मोठी कारवाई केली आहे.
NIA Raid: NIA ने आता पर्यंत 15 जणांना ताब्यात घेतले आहे. या 15 जणांना अटक दाखवली आहे. या सर्व आरोपींना घेऊन NIA दिल्लीच्या पटियाला कोर्टात हजर करणार आहे. विमानाच्या माध्यमातून या आरोपीना दिल्ली पटियाला येथे घेऊन जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहिती प्रमाणे साकिब नाचन हा मुख्य सूत्रधार असून त्या सोबत 14 जणांना ताब्यात घेतले आहे.
Rabodi NIA Raid: NIA च्या वतीने ठाण्यातील राबोडी परिसरामधील चांदीवला या इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहत असणाऱ्या बापे कुटुंबावर NIA धाड टाकली. चार ते आठ दरम्यान चौकशी केली आहे.बापे कुटुंबातील एका सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वांचे मोबाईल तपासलले गेले आहेत. येथे काहीही मिळाले नसून चार ते आठ वाजे पर्यंत चौकशी केली आहे.अंजुम बापे हे आर्किटेक असून त्यांची कागदपत्र तपासणी केली त्यानंतर त्यांचा मोबाईल फोन जप्त करून चौकशीसाठी घेऊन गेले आहे
Pune NIA Raid: पुण्याच्या कोंढव्यातील तालाब मस्जिद परिसरात एनआयएचा छापा टाकला आहे. इग्निशीया सोसायटीतील नागरिकांची एनआयएकडून चौकशी करण्यात येत आहे.
NIA Pune Raid : पुण्यातही एनआयएचे छापे टाकण्यात आले आहे. कोंढवा परिसरात तालाब मशीद परिसरात पहाटे कारवाई सुरू आहे. कोंढव्यातून तिघे एनआयएच्या ताब्यात घेण्यात आले आहे.
Mumbai NIA Raid: मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागातही एनआयएचे छापे टाकण्यात आले आहे. एनआयएचे 20 हून अधिक अधिकारी छाप्यात सहभागी आहेत.
Sanjay Shirsath On NIA: दहशतवाद्यांच्या हालचाली किती जोरात सुरु आहेत हे एनआयएच्या छापेमारीवरुन लक्षात येतंय. या सगळ्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम एजन्सी करत आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी एनआयएच्या छाप्यावर दिलीय.
Sakib Nachan: मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड येथे 2002 आणि 2003 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांसाठी साकिब नाचनला दोषी ठरवण्यात आले होता. मात्र त्याला नंतर दोषमुक्त करण्यात आलं. त्याचबरोबर दहशतवाद प्रतिबंधक कायदा (POTA) अंतर्गत शस्त्रे बाळगल्याबद्दल नाचनला दोषी ठरवण्यात आले आणि त्याला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. दहा वर्षाची शिक्षा भोगून तो तुरुंगातून बाहेर आला होता . तुरुंगातून सुटल्यानंतर नाचन त्याच्या मूळ गावी बोरिवली इथे पडघा राहत आहे
Thane News: एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, एनआयएने ठाणे जिल्ह्यात एकूण 41 ठिकाणी छापेमारी करण्यात आले आहे. एनआयए ज्यात 31 ठिकाणे पडघा तर नऊ ठाणे शहर हद्दीत आहे. ज्यात कल्याण, भिवंडी आणि ठाणेचा राबोडी परिसरात आणि एक मीरा भाईंदर या ठिकाणी करण्यात आली आहे.
NIA Raid : देशाभरात एकूण 44 ठिकाणी हे छापेमारी करण्यात आलेली आहे. यामध्ये 41 ठाणे जिल्ह्यात तर दोन पुणे व एक कर्नाटक या ठिकाणी करण्यात छापेमारी केल्या आहेत. एनआयएने आतापर्यंत सुमारे 15 जणांना ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वी पुणे आयएसआयएस प्रकरणात अनेकांना अटक करण्यात आले होते ज्यामध्ये आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले होते आणि आता या प्रकरणाशी संबंधीत ही कारवाई करण्यात आली आहे.
पार्श्वभूमी
NIA Raid: आयसीसशी संबंधांच्या (ISIS Conspiracy Case) आरोपांवरून एनआयएने ठाणे जिल्ह्यासह (Thane NIA Raid) देशात मोठी कारवाई केलीय. देशात एनआयएने 44 ठिकाणी छापे मारले. त्यातले एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31 ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर 14 जणांना ताब्यात घेतलंय. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करणयात आले आहे. साकीब नाचण याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होताा. पुणे आयसीस प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण याला अटक केली होती. आता या सर्वांना एनआयएने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलीय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -