पंढरपूर : एका बाजूला निवडणुकीमुळे कोरोनाचा प्रसार झाल्याचे वास्तव असताना आता काल रात्री आमदार झालेले समाधान अवताडे यांनी आज सकाळीपासून थेट कमला सुरुवात केली आहे.  आज मंगळवेढा आणि नंतर पंढरपूर येथे अधिकाऱ्यांच्या बैठक घेत कोरोना उपाययोजनांबाबत त्यांना सूचना दिल्या. काल जरी आमदार झालो असलो तरी आनंद साजरा करायचा आणि जल्लोष करायची वेळ नसून कोरोनाचे संकट वाढत चालल्याने पहिल्यांदा त्याच्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आज सकाळीपासून कामाला  सुरुवात केल्याचे नवनिर्वाचित आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.  


सध्या पंढरपूर आणि मंगळवेढ्यात नागरिकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यात मोठ्या अडचणी येत असून कोविड केअर सेंटर देखील फुल झाल्याने नवीन जागांची व्यवस्था उभी करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. सध्या पंढरपूरमध्ये ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा जाणवत असून तीच अवस्था रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीत होत असल्याने जादाचा साठा मिळवण्याबाबत प्रयत्न सुरु केल्याचे अवताडे यांनी सांगितले. 


पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : भाजपचे समाधान आवताडे विजयी; भगीरथ भालकेंच्या पराभवाची कारणे?


माझ्याजवळ केवळ साडेतीन वर्षाचा कालावधी असल्याने पहिल्यांदा कोरोना संकट आणि नंतर पाणी प्रश्नासह इतर अडचणी सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. कमी वेळ व जादा आव्हाने असल्याने वेळेचे नियोजन करत वेगाने कामे पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असून जनतेचा विश्वास पूर्ण करण्याची जबाबदारी समर्थपणे पार पडणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.


Pandharpur Election Result : लग्नाच्या वाढदिवशी समाधान आवताडेंना आमदारकीचं गिफ्ट, आवताडेंच्या विजयाची 'ही' आहेत कारणं


राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजनीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे.