मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अदर पुनावाला यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं. पुनावाला देशात नसताना आणि त्यांनी सुरक्षा व्यवस्था मागितलेली नसताना केंद्रानं त्यांना सुरक्षा का पुरवली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्रानं पुनावाला यांना सुरक्षा पुरवण्यामागं नेमका काय खेळ आहे असा प्रश्नही त्यांनी मांडला. सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. 


अदर पुनावाला यांनी आपण भारतात परतणार नसून तिथं आपल्या जीवाला धोका आहे असं सांगितलं होतं. पण, आता आपण भारतात परत येत आहोत असं त्यांचं वक्तव्य पाहायला मिळत आहे. त्यांच्या या निर्णयाचं काँग्रेस स्वागत करत असल्याचं ते म्हणाले. 


पुनावाला यांना नेमकं कोणी धमकावलं याचा खुलासा त्यांनी करायला हवा. त्यांना देण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेमागचं कारण नेमकं काय हेसुद्धा तपासण्यात आलं पाहिजे. मुळात न मागताही त्यांना सुरक्षा दिली जाते याचा खुलासा पुनावाला आणि केंद्रानं करायला हवा अशी मागणी नाना पटोले यांनी केली. 


काँग्रेस पुनावाला यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यास तयार आहे, त्यांनी नागरिकांन लस पुरवण्याचं काम करावं असं सांगत त्यांनी पुनावाला यांना फोनवरुन धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा झालाच पाहिजे याचा पुनरुच्चार केला. 


लसीकरण प्रक्रियेत केंद्राची नियोजनशून्यता 


आपल्या देशात कोरोनाचं थैमान असतानाही लसीकरण न झाल्याने लोकांचा जीव जात आहे. या साऱ्याला केंद्र सरकारची नियोजन शून्यता कारणीभूत आहे. असं म्हणत नाना पटोले यांनी रेमडेसिवीरच्या काळाबाजारासाठीही केंद्रालाच कारणीभूत ठरवलं. केंद्रानं रेमडेसिवीरची निर्यात तर थांबवली. पण, खुल्याबाजारात हे औषध उपलब्ध करुन दिलं नाही, त्यामुळेच रेमडेसिवीरचा काळाबाजार फोफावला, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. 


छगन भुजबळ यांच्याबात चंद्रकांत पाटील यानी केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले... 


भाजप संस्कारी पक्ष आहे असं वारंवार सांगतात, त्यांचे संस्कार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रदर्शित होत आहे. एका जबाबदार मंत्र्यांना याप्रकारे धमकी द्यायची, पण हे करताना त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी एक बोट दुसर्‍याकडे करताना चार बोटं तुमच्याकडे आहेत. देशाच्या गृहमंत्रालयाकडे लक्ष केंद्रीत करा म्हणजे तुम्हाला सगळी उत्तरं प्राप्त होतील, असं ते म्हणाले.