पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या समाधान आवताडे यांना विजय मिळाला. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेली ही हक्काची जागा आवताडे यांनी खेचून आणली. या आनंदाच्या दिवशी दुग्धशर्करा योग जुळून आल्याने त्यांचा हा विजय खास बनला आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून याच दिवशी त्यांना अतिशय चुरशीच्या निवडणुकीत आमदारकी मिळाली. या विजयात आपल्या गृहलक्ष्मीच्या शुभेच्छा असल्याचे समाधान आवताडे सांगतात. या विजयानंतर लगेच उद्यापासून मंगळवेढा येथील पाणी प्रश्न हाती घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आवताडे यांनी सांगितले.


पंढरपूर पोटनिवडणूक 2021 : भाजपचे समाधान आवताडे विजयी; भगीरथ भालकेंच्या पराभवाची कारणे?


पांडुरंग परिवार आणि सर्व पंढरपूर-मंगळवेढ्यातील जनतेची ताकत मिळाली. लोकं पाठिशी उभे राहिले. हा विजय जनतेचा आहे. सरकारच्या विरोधात जनतेनं दिलेला कौल आहे. प्रचारादरम्यान विरोधकांनी आमच्यावर टीका केल्या मात्र या टीकेला जनतेनं मताच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे, असं समाधान आवताडे म्हणाले. 


राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली. दिवंगत भाजप भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजणीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे. 


आवताडेंच्या विजयाची ही आहेत प्रमुखं कारणं


मंगळवेढ्याचा स्थानिक उमेदवार व भूमिपुत्र म्हणून समाधान आवताडे यांना फायदा झाला.


एक उद्योजक म्हणून राजकारणात आलेल्या आवताडे यांच्याकडे आर्थिक बाजू भक्कम आहे. 


त्यांच्या जोडीला भाजपने विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक यांची जोडून दिलेली साथ त्यांना पंढरपूर आणि मंगळवेढा भागात खूप फायदेशीर ठरली.


परिचारिकांच्या पांडुरंग परिवाराने संपूर्ण ताकतीने केलेला प्रचार आणि मतदान यामुळे अवताडे याना यंदा पंढरपुरात चांगली मते मिळाली. 


मंगळवेढा भागातही परिचारक समर्थकांची मते मिळाल्याने विजयाची अशा पल्लवित झाल्या आहेत. 


विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या 6 जंगी सभा हा त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला.


 प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात अतिशय नियोजनबद्ध रीतीने झालेले काम त्यांना उपयोगी ठरले.