- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
LIVE UPDATES | सीबीएससी बोर्डप्रमाणे 15 एप्रिलनंतर बारावी आणि 1 मे नंतर 10वीची परीक्षा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
LIVE UPDATES | सीबीएससी बोर्डप्रमाणे 15 एप्रिलनंतर बारावी आणि 1 मे नंतर 10वीची परीक्षा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना आज भारतात परवानगी मिळण्याची शक्यता, डीसीजीआयच्या निर्णयाकडे लक्ष कोवॅक्सिन लस चाचणीचा नागपुरात आज अंतिम टप्पा , दोन टप्प्यात साईड इफेक्ट नसल्याचा दावा ईडीच्या नोटिशीनंतर एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह, अहवालात गौडबंगाल असल्याचा आरोप देशातील काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून इशारा देशभरासह राज्यातील महत्वाच्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, आर्थिकसह खेळ आणि मनोरंजनाबाबत महत्वाचे अपडेट्स, सोबतच दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
03 Jan 2021 07:25 PM
महाराष्ट्रात औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याची जोरात चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे आहे. आपण सर्वधर्मसमभाव मानतो. नाव बदलण्याच्या वादामुळे विकासाला खीळ बसते व भाजप सारख्या पक्षाला हेच पाहिजे त्यामुळे एखाद्या मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून त्या जिल्ह्याला संभाजीनगर नाव देण्यात यावे व हा प्रश्न कायमचा सोडवावा अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत आहे.
कोथरूड परिसरातील वेताळ टेकडीवर आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेला एक तरुण पाय घसरल्याने टेकडीवरून खाली कोसळला. नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्यानंतर जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत या तरुणाला जाळीच्या सहाय्याने वर काढले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या तरुणावर सध्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तनिष्क विशाल लोढा (वय 16) असे या तरुणाचे नाव आहे.
नाशिक जिल्ह्यातील नववी ते बारावीचे 2267 वर्ग उद्यापासून सुरु होणार. नाशिक महापालिकेच्या 13 शाळाचांही समावेश. आतापर्यंत 72 टक्के शिक्षकांच्या कोरोना टेस्ट पूर्ण झाल्या आहेत. 28 टक्के पालकांकडून संमती पत्र प्राप्त झाले आहे. अकरावीचे ज्या विद्यार्थ्यांचे अंतिम प्रवेश झाले आहेत. त्यांचे वर्ग सुरु करण्याच्याही शिक्षण उपसंचालकांच्या महाविद्यालयांना सूचना. शाळा सॅनेटायझेशनसह स्वच्छतेचीही कामे पूर्ण झाली असून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवा, पालकांना शिक्षण विभागाचे आवाहन.
औरंगाबादचे नाव बदलण्यास रिपब्लिकन पक्षाचा तीव्र विरोध राहील, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं ट्वीट
कोल्हापूर - कळंबा कारागृहात कॅमेरे बसवणार ,
68 कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव सादर ,
जिल्हा नियोजन समितीकडे 50 लाखांचा प्रस्ताव ,
12 हायमास्ट दिवे बसवण्याचेही नियोजन ,
,
गेल्या महिन्याभरात गांजा आणि मोबाइल सापडल्याने प्रशासनाचा तात्काळ निर्णय
,
सीसीटीव्ही कॅमेरामुळे कारागृहातील हालचालींवर राहणार लक्ष
भारतात कोरोना लशीची प्रतीक्षा संपली. देशात सीरम, भारत बायोटेकच्या लसींना आपात्कालीन वापरासाठी मंजुरी. सरसकट वापरासाठी अद्यापही निर्णय नाही.
यंदाचा खंडोबाच्या पाली यात्रेची तयारी ग्रामस्थ करत असताना प्रशासकीय यंत्रणेकडून बैठकीद्वारे यंदा यात्रा करू नये असा प्रस्ताव मांडण्यात आला.
रूढी परंपरेनुसार रथ निघू द्यात, मंदिरामध्ये मानकरी येऊ द्या आम्ही सोशल डिस्टन्स पालन करू, बाहेरून येणाऱ्या भाविकांना मंदिराजवळ येऊन देणार नाही.तशी आम्ही काळजी घेऊ किमान दहा किलोमीटरचा परिसरामध्ये सर्व वाहनांना नो इंन्ट्रीचा बोर्ड लावू.मात्र रुढी परंपरेला तडा जाऊन देऊ नका असा प्रस्ताव मंदिर कमिटीने प्रशासकीय यंत्रणेने समोर मांडला. दिनांक 9 रोजी पुन्हा एक बैठक होणार आहे. बैठक मंदिर समितीचे प्रमुख, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.
त्यामुळे काल झालेल्या प्रशासकीय यंत्रणेच्या बैठकीमध्ये कोणताच पालीच्या यात्रे बाबत कोणताही रद्दचा निर्णय झालेला नाही.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. 191 व्या जयंती निमित्ताने शासनाच्या वतीने त्यांच्या जन्मगावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला जातोय. सावित्रीबाई फुले यांचे जन्मस्थळ. त्यांचे घर फुलांचा माळांनी सजवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर गावातील घरा घरा समोर रांगोळी टाकण्यात आलेली आहे. रांगोळीची नव्हे तर प्रत्येक घरावर गुढी उभारून गुढी उभा करून मोठा आनंद उत्सव साजरा केला जातोय. सावित्रीबाई फुले यांच्या निवासस्थानापासून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले त्यांचे प्रतिमा असलेली पालखी त्यांच्या निवासस्थानापासून महिलांनी आपल्या खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली. या पालखी सोहळ्याला गावातील तसेच पंचक्रोशीतील महिलांनी येऊन खांदा देऊन आनंद उत्सव साजरा केला. यावेळी ढोर ताशा आणि तुतारीच्या निनादाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. त्यांच्या उत्सवानिमित्ताने मोठ्या प्रमाणात महिला मुली यांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करत आशीर्वाद घेतला.
भिवंडी- काल्हेर ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार शिवसेना शाखाप्रमुख दीपक म्हात्रे यांच्यावर गोळीबार, गोळीबार चुकल्याने दीपक म्हात्रे थोडक्यात बचावले,
मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञाताकडून गोळीबार , सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती,
भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांमधील राड्यांना सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा - चंदगड रोडवर महाकाय हत्तीचे दर्शन,
रस्ता ओलांडताना हत्ती स्थानिक नागरिकांच्या नजरेस पडला,
आजरा तालुक्यात हत्तीचा मोठ्या प्रमाणात वावर,
हत्तीमुळे उसाबरोबर इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
विद्यार्थ्याला "आताच माझ्यासमोर जीव दे, मी तुझे डॉक्यूमेंट देत नाही, हे कॉलेज काही तुझ्या बापाचे नाही, जा मुख्यमंत्र्याना जाउन सांग ही बाई मला शिव्या देतेय!" असं म्हणून गरीब विद्यार्थ्याला शिविगाळ करणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या महिला प्राचार्यांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे. याच शिक्षण संस्थेत डिझेल मेकेनिकला शिकणाऱ्या आम्रपाल भिलंगे या विद्यार्थ्यांसोबत घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे.
एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तलवारीने हल्ला झाल्याची घटना बीडमध्ये घडलीय. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली असून, बीडमधीलच एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोपट बोबडे (वय 27, रा. महालक्ष्मी चौक, रामनगर, ता. बीड), असे आरोपीचे नाव आहे. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता तिचे आई-वडील किराणा आणण्यासाठी गेले होते. घरी वृद्ध आजोबा होते. पीडित मुलगी तोंड धुण्यासाठी घराबाहेर आल्यानंतर पोपट बोबडे याने पाठीमागून येऊन अचानक तिच्यावर तलवारीने हल्ला केला; परंतु हा वार तिने हातावर झेलला.
ख्यातनाम इतिहाससंशोधक डॉ. भा. रा. अंधारे यांचे शनिवारी सायंकाळी भरत नगरातील राहत्या घरी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुकुंद व चैतन्य ही दोन मुले, स्नुषा, नातवंडे असा आप्त परिवार आहे.
ईडी विरोधात शिवसेना उतरणार रस्त्यावर ?
५ जानेवारीला महाराष्ट्रातून शिवसैनिक मुंबईत दाखल होणार
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, मिरा भाईंदरमधून बसेस, कारनं शिवसैनिक दाखल होणार
पुणे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 1 लाख 10 हजार आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. त्याच लसीकरणाची नेमकी प्रक्रिया काय असेल याचा रंगीत तालीम सुरू झालीये. पुण्यातील माण प्राथमिक आरोग्य केंद्रावर जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्वतः येऊन पाहणी केली.
अभिनेता जितेंद्र जोशीनं "गोदावरी" चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं असून, पुणे 52 या चित्रपटातून लक्ष वेधून घेतलेला दिग्दर्शक निखिल महाजनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्र दिनी (1 मे) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला.
नाशिक - गॅस गिझरचा स्फोट होऊन एका 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू, श्वास गुदमरल्याने गौरव पाटीलचा मृत्यू, सिडको परिसरातील दौलतनगरमधील काल दुपारची घटना, गॅस लिकेज झाल्याचा पोलिसांना संशय , जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होण्यापूर्वीच मृत्यू, अंबड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
भीमा - कोरेगाव येथे गौरव गाथा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नांदेड शहरातून दुचाकी रॅली आयोजित केली होती . पोलिसांनी ही रॅली अडविली होती . या प्रकरणात सतरा जणांवर वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे . भीमा - कोरेगाव येथे जाण्यासाठी नांदेडहून दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते . महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांनी ही रॅली रोखली . त्यानंतर या प्रकरणात गुन्हे नोंदविले आहेत .
परभणी : नवीन वर्षाचे स्वागत अनेक जण विविध पद्धतीने करतात मात्र परभणीतील एक तरूण व्यवसायिक मागच्या दहा वर्षापासून नवीन वर्षात जन्मलेल्या कन्यारत्नास सोन्याचे नाणं आणि दोन किलो जिलेबी देण्याचा उपक्रम राबवतोय.
परभणीतील हरियाणा जिलेबी म्हणुन प्रसिद्ध असलेल्या जिलेबी व्यावसायिक सनी सिंग यांनी यंदाही हा उपक्रम सुरू ठेवलाय.जिल्हा सामान्य रुग्णालयात 1 जानेवारीला एकुण 9 मातांनी मुलींना जन्म दिला या नऊ मातांचे नाव चिट्ठीत लिहून एक लकी ड्रॉ काढण्यात आला यातील आशा किशन राठोड यांच नाव आलं त्यांना एक ग्राम सोन्याचे नाणे आणि 2 किलो जिलेबी देऊन गौरविण्यात आले आहे.
नामांतर मुद्यात शिर्डीचे शिवसेना खासदार लोखंडे यांची उडी. औरंगाबाद पाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करण्याची मागणी. अहमदनगर जिल्ह्याचे अंबिका नगर नामांतर करावे. अनेक वर्षांपासून ही आमची मागणी आहे. काँग्रेस विरोध करत असले तरी त्यांना योग्य बुद्धी होईल आणि दोन्ही जिल्ह्याचे नामांतर होईल. सेना खासदार सदाशिव लोखंडे यांची मागणी.
तुम्ही दक्ष राहता, जबाबदारी म्हणून आम्ही आमचे सण उत्साहाने साजरे करतो, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप
औरंगाबादमध्ये मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निदर्शने. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने टीव्ही सेंटरच्या संभाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने. थोरात यांनी औरंगाबादच्या नामकरणाला विरोध केल्यानं आंदोलन. तरुणांची बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात घोषणाबाजी...पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज भीमा कोरेगाव येथे जाऊन शौर्य दिनानिमित्ताने विजय स्तंभाला अभिवादन केले.
शेतकरी आंदोलनाचा आज 37वा दिवस. सिंघु बॉर्डरवर आज दुपारी 2 वाजता शेतकऱ्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सरकारसोबत 4 जानेवारी रोजी पार पडणारी बैठक आणि आंदोलनाच्या रणनितीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता शेतकरी संघटनांचे नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
शेतकरी आंदोलनाचा आज 37वा दिवस. सिंघु बॉर्डरवर आज दुपारी 2 वाजता शेतकऱ्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सरकारसोबत 4 जानेवारी रोजी पार पडणारी बैठक आणि आंदोलनाच्या रणनितीवर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता शेतकरी संघटनांचे नेते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड, मोहननगर इथे मध्यरात्रीची घटना. दोन गटातील वर्चस्ववादातून घटना घडल्याचा अंदाज, नाईट कर्फ्यू लागू असताना तोडफोड झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना गुन्हेगारांचे आव्हान कायम
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड, मोहननगर इथे मध्यरात्रीची घटना. दोन गटातील वर्चस्ववादातून घटना घडल्याचा अंदाज, नाईट कर्फ्यू लागू असताना तोडफोड झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना गुन्हेगारांचे आव्हान कायम
शेतकऱ्यांना नवीन वर्ष काय आणि जुने वर्ष काय सर्व सारखेच असते. कारण शेतकऱ्यांची परिस्थिती वर्षानुवर्षे सारखीच आहे. सगळीकडे नवीन वर्षाचे स्वागत होत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी आगळा-वेगळा थर्टी फर्स्ट साजरा केला. त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील नांद्राकोळी गावात श्रीकृष्ण काळवाघे यांच्या शेतात रात्री गव्हाला पाणी देऊन परिसरातील शेतकऱ्यांसोबत रात्र घालवली. शेतकऱ्यांसोबत चटणी-भाकर खाऊन जेवण केले. यावेळी तुपकरांमधील शेतकरी बघायला मिळाला. स्वतः तुपकरांनी शेतात उतरुन पिकाला पाणी देण्याचे काम केले.
सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करताना विठूरायाची राऊळी आकर्षक फुलांच्या सजावटीने घमघमून गेली आहे. सरत्या वर्षाने वारकरी संप्रदायाला खूप वेदनादायी आठवणी दिल्या होत्या. कोरोनाच्या संकटाने त्यांचे आराध्य असलेला विठुराया तब्बल आठ महिने कुलूपबंद अवस्थेत होता. वारकऱ्यांचे आषाढी, कार्तिकीसारखे सोहळे होऊ शकले नाहीत. आता या कटू आठवणी देणारे 2020 हे साल जाऊन येणाऱ्या 2021 या नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी मंदिर समितीने केली असून आळंदी येथील भाविक प्रकाश ठाकूर यांनी विविध प्रकारच्या एक टन फुलांनी विठ्ठल मंदिर अतिशय कल्पकतेने आकर्षक पद्धतीने सजवले आहे. विठ्ठल गाभाऱ्यात जाताना वारकरी संप्रदायाची वाद्ये असलेली टाळं, पखवाज, तबला, चिपळ्या, विणा ही वाद्ये साकारली आहेत. जरबेरा, झेंडू, शेवंती, अष्टर, गुलछडी अशा विविध रंगांच्या फुलांची आकर्षक पद्धतीने रंगसंगती साधत विठ्ठल मंदिर सजवण्यात आले आहे.
अर्थव्यवस्था बदलण्यासाठी सरकारकडे प्लॅन नाही, सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, प्रकाश आंबेडकरांची टीका, कोरेगाव भीमामध्ये केलं अभिवादन
अर्थव्यवस्था बदलण्यासाठी सरकारकडे प्लॅन नाही, सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, प्रकाश आंबेडकरांची टीका, कोरेगाव भीमामध्ये केलं अभिवादन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला अभिवादन
पार्श्वभूमी
दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Corona Vaccine | जागतिक आरोग्य संघटनेकडून Pfizer-BioNTech लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी
जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी (31 डिसेंबर) फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारीनंतर डब्लूएचओकडून एखाद्या लसीला मंजुरी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. डब्लूएचओच्या या निर्णयानंतर अनेक देशांसाठी मार्ग मोकळा झाला आहे की, ते फायजर-बायोटेक लसीच्या आयातीला मंजुरी देऊन वितरणाला सुरुवात करतील. ब्रिटनने सर्वात आधी म्हणजेच 8 डिसेंबरला या लसीच्या इमर्जन्सी वापराला मंजुरी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनच्या देशांनीही या लसीच्या वापराला मंजुरी दिली होती.
राज्यातील चार शहरांमध्ये 2 जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन : राजेश टोपे
कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर 2 जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. ड्राय रनसाठी एकाच जिल्ह्यातील तीन साईट (आरोग्य केंद्र) निवडण्यात आले आहेत. लसीकरणाच्या या ड्राय रनमध्ये निवडण्यात आलेल्या तीनही ठिकाणच्या प्रत्येकी 25 जणांना लसीकरणासाठी निवडण्यात येणार आहे. मात्र प्रत्यक्षात लस टोचण्यात येणार नाही मात्र त्यासाठी ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याप्रमाणे सर्व तयारी केली जाणार आहे. लसीकरणाच्या ठिकाणी वीज, इंटरनेट, सुरक्षा यासोबत प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष असे तीन कक्ष केले जातील.
केरळ विधानसभेत कृषी कायद्याविरोधातील प्रस्तावाला भाजप आमदाराचे समर्थन!
केंद्राच्या नवीन कृषी कायद्याविरुद्ध केरळ विधानसभेत आणलेल्या प्रस्तावाला भाजपचे एकमेव आमदार राजगोपालन यांनी पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावात केंद्रीय कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली असून या निषेधार्थ हजारो शेतकरी एका महिन्यापेक्षा जास्त काळापासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहेत. केरळ भाजपने आपले आमदार ओ. राजगोपालन यांच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. केरळ भाजप नेते के. एस. राधाकृष्णन म्हणाले, की "राजगोपालन सारख्या व्यक्तीने केंद्र सरकारविरूद्ध हे पाऊल का उचलले हे मला समजले नाही. एकटा सभासद काहीच करु शकत नाही हे सर्वांना माहित आहे. पण, त्यांनी यावर आक्षेप घ्यायला हवा होता. हा निर्णय भाजप विचारांविरुद्ध आहे."
FASTag Deadline Extends | वाहनचालकांना दिलासा, फास्टॅग लावण्याची मुदत दीड महिन्यांनी वाढवली!
केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य करण्याची मुदत वाढवली आहे. केंद्र सरकारने टोलनाक्यावर टोल वसुली सोपी आणि सुरक्षित बनवण्यासोबतच वाहतूक कोंडीतू मुक्तता व्हावी यासाठी चारचाकी वाहनांनासाठी 1 जानेवारीपासून फास्टॅग अनिवार्य केलं होतं. परंतु वाहचनालकांना फास्टॅग मिळण्यात येणाऱ्या अडचणी पाहता केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवली आहे.