Maharashtra News : विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर पेनड्राइव्ह बॉम्ब फोडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला होता. मविआला अडचणीत आणण्याऱ्या पेन ड्राईव्ह प्रकरणात आता नवा खुलासा करण्यात आला आहे, पेनड्राईव्ह प्रकरणात पत्रकार आणि पोलीस कॉंस्टेबलचाही समावेश असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे, 


पेनड्राईव्ह प्रकरणी नवा खुलासा, पत्रकार आणि पोलीस कॉंस्टेबलचाही समावेश?


राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली होती. पेनड्राईव्ह प्रकरणात पुण्यातील पत्रकार आणि पोलीस कॉंस्टेबलचाही समावेश असल्याची सुत्रांकडून माहिती मिळत आहे,  स्टिंग ऑपरेशनमध्ये तेजस मोरेसह एका पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.


देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?


राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले. 


काय आहे प्रकरण?


जळगावमधील निभोरा पोलीस ठाण्यात याबाबत प्रथम फिर्याद नोंदविण्यात आली होती. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अॅड. विजय पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे. मात्र कोथरूड परिसरात ही घटना घडल्यामुळे फिर्याद तिकडे वर्ग करण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार ट्रस्टची कागदपत्रे घेण्यासाठी तक्रारदाराला पुण्यात बोलविण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना प्रथम एका हॉटेलमध्ये आणि नंतर एका फ्लॅटमध्ये नेण्यात आले. त्यानंतर काही लोकांनी, "गिरीशभाऊंना ट्रस्टवर ताबा हवा, म्हणून तुम्ही आता राजीनामा द्या", अशी धमकी दिल्याचं पोलीस तक्रारीमध्ये पाटील यांनी म्हटलेलं आहे.  


सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार


विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले आरोप फेटाळून लावले. या व्हिडीओंमागे देखील जळगाव कनेक्शन असल्याचं म्हटलं आहे. प्रवीण चव्हाणांच्या आरोपांवर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. एवढे दिवस प्रवीण चव्हाण कुठे होते? असा फडणवीसांनी सवाल केलाय. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाणांबद्दल लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. प्राप्त झालेल्या तक्रारीची खातरजामा करून माहिती देईन असं सांगत प्रवीण चव्हाणांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीवर फडणवीसांनी उत्तर दिलंय. तसेच प्राप्त झालेल्या तक्रारीची खातरजमा करून माहिती देईन. क्लिप खोट्या ठरवण्याचा कितीही प्रयत्व केला तरी आम्ही पूर्ण तयारी केलीय. असे उत्तर फडणवीसांनी दिले आहे.


स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड -  प्रवीण चव्हाण


चव्हाण यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे, असं प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. यातून या स्टिंग ऑपरेशनमधील जळगाव कनेक्शन उघड होतं आहे, असंही प्रवीण चव्हाण म्हणालेत.  प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं की, या प्रकरणात पुरावे आहेत म्हणून कारवाई होतेय.  माझे रेकॉर्डिंग मॅनिप्युलेट करुन वापरण्यात आलं आहे. व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत.  वाक्ये अर्धवट वापरण्यात आली आहेत. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला. असे प्रवीण चव्हाण म्हणाले होते.


संबंधित बातम्या


महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकाला मारहाण, 'फी'बाबत चर्चेसाठी शाळेत आल्यानंतरचा प्रकार


Maharashtra Budget Session: फडणवीसांनी वाचलेल्या भाषणातील शब्द अन् शब्द जशाच्या तसा; वाचा संपूर्ण भाषण


Sanjay Raut : सरकार दुसरा पेनड्राइव्ह घेऊन समोर येईल, संजय राऊतांचे फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर