LIVE UPDATES | बिलोली बलात्कार व हत्या प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड पोलिसांकडून अटक

बर्ड फ्लूबाबत अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने योग्य माहिती द्यावी : मुख्यमंत्री लसीकरणाबाबत अफवा पसरु नये, राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, पंतप्रधान मोदींच्या सूचना हिंगणघाटच्या प्राध्यापिका जळीत कांडप्रकरणी तीन जणांची साक्ष नोंद हनुमा विहारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Jan 2021 10:33 PM
नाट्यपरिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यावर आज झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत अविश्वास ठराव. बहुमत सिद्ध करण्यासाठी येत्या 15 दिवसात कांबळी यांना विशेष नियामक सभेचे आयोजन करून बहुमत सिद्ध करावे लागणार.
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक, ड्रग्स कनेक्शनमध्ये झाली अटक, आरोपी करण सजनानीच्या चौकशीत नाव आल्याने समन्स पाठवून चौकशीला बोलावण्यात आले होते, सकाळी 10 पासून सुरू होती समीर खान यांची चौकशी
नांदेड: बिलोली येथील बलात्कार व खून प्रकरणातील दोन आरोपींना नांदेड पोलिसांकडून अटक, तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातून पोलिसांनी घेतले ताब्यात
अमरावतीच्या देऊरवाडा येथील आत्महत्येची चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेला शेतकरी अखेर आज आपल्या गावी परतला.. शेतकरी विजय सुने हे शेगावला गेल्याची विजय सुने यांनी एबीपी माझाला माहिती दिली.. दरम्यान काल विजय सुने यांच्या पत्नीने शिरजगाव कसबा पोलिसात तक्रार दिली की, माझ्या पतीने आत्महत्या केली तर राज्यमंत्री बच्चू कडू, त्यांचे खाजगी सचिव, तहसीलदार, ठाणेदार, बिट जमादार हे जबाबदार राहतील..त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.. यावेळी विजय सुने यांनी पोलिसांच्या धमकीने वैतागल्याचा केला होता चिठ्ठीत उल्लेख.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
श्री. मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर आयोगाकडे तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने आयोगाने अहवाल मागविले होते. जिल्हाधिकारी, निवडणूक निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांचा अहवाल; तसेच विविध कागदपत्रे आणि ध्वनिचित्रफितींचे अवलोकन केल्यानंतर या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. खोंडामळी येथील लिलावाप्रकरणी आधीच नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आता अधिक तपास करून भारतीय दंड विधानाचे कलम 171 (क) अथवा अन्य कायद्यांतील तरतुदींनुसार संबंधितांविरूद्ध कायदेशीर कारवाई करून आयोगास अहवाल सादर करावा, असे निर्देश नाशिक आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत.
केवळ काही ग्रामस्थांच्या एकतर्फी दबावात्मक निर्णयामुळे इच्छूक उमेदवारांना मुक्त वातावरणात निवडणूक लढविण्यापासून आणि मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार या दोन्ही गावांमध्ये झाला आहे. यातून लोकशाहीच्या मूलभूत तत्वांचे आणि आचारसंहितेचे भंग झाल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत आहे. अशा प्रकारांमुळे निवडणूक लढविण्याची सर्वांना समान संधी प्राप्त होऊ शकत नाही. हे प्रकार टाळण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर आहे. ही संविधानात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयोगाने या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
नाट्यपरिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यावर आज झालेल्या नियामक मंडळाच्या सभेत अविश्वास ठराव. बहुमत सिद्ध करण्यासाठी येत्या 15 दिवसात कांबळी यांना विशेष नियामक सभेचे आयोजन करून बहुमत सिद्ध करावे लागणार.
सर्व वादाच्या पार्शवभूमीवर धनंजय मुंडे यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्यावरील गंभीर आरोपानंतर पवार यांची भेट. प्रत्यक्ष भेट घेऊन होत असलेल्या आरोपावर स्वत:ची भूमिका पवारांसमोर मांडल्याची चर्चा. कॅबिनेटआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे झालेल्या बैठकीला मुंडे यांनी हजेरी लावली होती.
भिवंडी : भिवंडी पालिका क्षेत्रातील 90 घंटागाडी ठेकेदारांचे पैसे थकल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद केलं आहे. परिणामी शहरात कचऱ्याचे ढीग साचले असून परिसरात दुर्गंधी पसरलीय. शहरातील 90 वॉर्डचा कचरा संकलन करण्याची जबाबदारी एका खाजगी ठेकेदारांच्या घंटागाडीवर सोपविण्यात आलीय. या ठरकेदारांना मागील एक वर्षांपासून मासिक पैसे देण्याबाबत नियमित टाळाटाळ होत असल्याने सोमवारपासून कामगारांनी कचरा उचलणं बंद केलंय. दरम्यान थकीत पैसे तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाण पुलावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बाईक रायडर्सचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. चारोटी उड्डाण पुलावरून भरधाव बाईक रायडर्स पुलाखाली पडून मीरा रोड येथील सिद्धेश परब या 22 वर्षीय तरुणांचा मृत्यू झाला होता .सदर घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. रविवारी मुंबईतून पालघर भागात येणाऱ्या भरधाव बाईक रायडर्स येत असून वेगावर नियंत्रण न आल्यामुळं आता पर्यँत अनेक अपघात घडून रायडर्स चा मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत.
कोविड-19 बाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.
श्री. मदान यांनी सांगितले की, कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबर 2020 रोजी तपशीलवार मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यात आता मतदानाच्यादृष्टीने अधिक स्पष्टता आणली आहे. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी 3.00 पर्यंत मतदानाची वेळ असेल. कोविड बाधित नसलेले, परंतु प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये वास्तव्यास असलेल्या मतदारांच्या शरीराच्या तापमानाची दोनदा तपासणी केली जाईल. त्यांचे तापमान विहित निकाषांपेक्षा जास्त नसल्यास, अशा मतदारांना सर्वसाधारण मतदारांप्रमाणे सकाळी 7.30 पासून मतदान करता येईल.
मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलविण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्यादृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.
महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांप्रकरणी भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून याबाबतची मागणी.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीकडून समन्स, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानीच्या चौकशीदरम्यान समीर खान यांचं नाव समोर आल्याची सूत्रांची माहिती, एनसीबी कार्यालयात चौकशी सुरु
नवाब मलिकांचे जावई, समीर खान यांना एनसीबीचं समन्स. किरीट सोमय्यांचा दावा . आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर करण सजनानी याच्या चौकशीदरम्यान नाव उघड.
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये वाहनं तोडफोडीनंतर आता वाहनं पेटवण्याची घटना समोर आलेली आहे. पिंपरीमध्ये तब्बल 10 दुचाकी पेटवण्यात आल्या आहेत. दुचाकींना लावण्यात आलेल्या आगीमुळे काही काळातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. त्यामुळे आजूबाजूच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पैशाच्या वादातून ही वाहनं पेटवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
मुंबई : सीरमची कोविशिल्ड लस मुंबईत दाखल झाली आहे. पहाटे साडेपाच वाजता लसीचा पहिला साठा मुंबईत पोहोचला आहे. मुंबईला पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटकडून 1 लाख 39 हजार 500 लसीचे डोस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. मुंबईत कोविशिल्ड लस दाखल झाल्यानंतर आता 9 रुग्णालयातील केंद्रांवर त्यांच वितरण होणार आहे. मुंबईतील केईएम, सायन, नायर, व्हीएन. देसाई, भावा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी जम्बो सेंटर याठिकाणी लसीकरण होणार आहे.
औरंगाबाद : नामांतराचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला असून मनसे पदाधिकाऱ्यांनी आज थेट पोलीस ठाणं गाठलं आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकचा औरंगाबाद नाका परिसरात मनसेनं संभाजीनगरकडे जाणार मार्ग असा नाम फलक लावला होता. तो फलक हटविण्यात आला असून फलक चोरीला गेल्याची मनसेनं पंचवटी पोलिसांत तक्रार दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत प्रमुख पदाधिकारीच्या बैठक घेतल्यानंतर नाशकात मनसे आक्रमक झाल्याच बघायला मिळत आहे.
कोरोनातून बरे होताच घरी परतलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांनी आज चांदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. त्यांना दिलासा देत नुकसान झालेल्या द्राक्ष बागांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्याचा अहवाल शासनासमोर ठेवण्यात येऊन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करू असे यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलंय.
राजमाता जिजाऊ यांच्या 422 व्या जयंतीच्या विशेष कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च "मराठा विश्वभूषण पुरस्कार"
2 दुचाकींच्या समोरासमोर धडकेत 2 युवक ठार तर 3 गंभीर जखमी, भरधाव वेगाने घेतले 2 बळी, मूल-ताडाळा मार्गावर झालेल्या अपघातात स्वप्नील गुज्जनवार आणि रविंद्र कावळे यांचा मृत्यू, अन्य 3 जखमीना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. मूल पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
नागपूर : रामबाग परिसरात एका दुचाकी चालकाचा नायलॉन मांजाने गळा चिरला जाऊन मृत्यू. 20 वर्षाचा तरुण रस्त्यावरून दुचाकीने जात असताना रस्त्यावर नायलॉन मांजा आडवा आला. अभिषेक शेंडे असे तरुणाचं नाव. चालत्या गाडीवर गळा चिरून जाऊन जागेवरच मृत्यू झाला आहे.
चंद्रपूर : मुलगी आणि तिच्या आईचे अपहरण करणाऱ्या आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने केली अटक... लग्न मोडल्याचा रागातून आज सकाळी एका तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने नागभीड तालुक्यातील पाहर्नी गावातून मुलीचे आणि तिच्या आईचे केले अपहरण, चंद्रपूर पोलिसांनी नागपूर ग्रामीण पोलिसांच्या मदतीने नागपूर-मध्यप्रदेश ची सीमा असलेल्या केळझर येथे आरोपींना केली अटक, कुही तालुक्यातील रूयाळ या गावातील रामकृष्ण भोयर या तरुणाचे या अपहृत मुलीसोबत जुळले होते लग्न, पण मुलाची वागणूक नीट नसल्याचे कारण देत मुलीच्या घरच्यांनी लग्न तोडले, याच रागातून आरोपी तरुणाने आपल्या ५ साथीदारांच्या मदतीने आज सकाळी केले अपहरण, रामकृष्ण भोयर आणि त्याच्या २ साथीदारांना अटक तर इतर ३ जण फरार
बारामती : बारामतीतील ढवान पाटील चौकात दुधाचा टेम्पो आणि दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाली आहेत. मृत व्यक्ती ही माळेगाव इथली आहे. बाबासो खोमणे हे बारामतीला दूध घालण्यासाठी आले होते. तिथून घरी जाताना हा अपघात झाला. दुधाचा रिकामा टँकर हा भरण्यासाठी फलटणहून बीडकडे निघाला होता. सदर दुधाचा टँकर हा तिरुमाला डिअरी कुटे ग्रूप चा आहे. अपघात झाल्यानंतर आरोपी रामभाऊ सालगुडे हा स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. आरोपीवर बारामती शहर पोलीस ठाण्यात कलम 304 अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.
मुंबई लोकलची सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचे राज्य सरकारचे संकेत, येत्या आठवड्यात घोषणा होण्याची चिन्ह,
लोकल प्रवाशांसाठी चेन्नई पॅटर्नची शक्यता, गर्दी नसणाऱ्या वेळेतच सर्वसामान्यांना प्रवासासाठी परवानगी मिळणार
भाजप नेते आशिष शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. विशेष म्हणजे काही वेळापूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर यांच्यासह शरद पवारांच्या भेटीला पोहोचले होते.
सोलापूर : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुस्लिम बांधवांनी सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचे स्वागत केले. दरवर्षी विजापूर वेस परिसरात मुस्लिम बांधव नंदीध्वजावर पुष्पवृष्टी करत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा केवळ योगदंड आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली. बग्गीतून आलेल्या मानकऱ्यांवर पुष्पवृष्टी करत सामाजिक सलोख्याचे दर्शन यावेळी दिसले.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील घारपी घाटात एसटी बसला अपघात झाला आहे. विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घारपीहुन बांद्याच्या दिशेने येताना घारपी-बांदा ही एसटी घारपी घाटात कोसळून अपघात झाला. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं आहे. एकूण सहा जण जखमी झाले असून जखमींवर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
नाशिक : नाशिक जिगल्ह्यातील त्रंबकेश्वर येथील पहिने नवरी सुळक्यावर जिजाऊ जयंती साजरी. नाशिक पासून साधारणता 25 किलोमीटर अंतरावर हा सुळखा आहे. 300 फूट उंची आहे या सुळक्याच्या आजू बाजूला अंजनी पर्वत, ब्रम्हगिरी पर्वत आहेत. तसेच या ठिकाणी नवरा सुळखा पण आहे. नवरा नवरी सुळके एकमेकांच्या बाजूला आहेत जोडून यात नवरी सुळका उंची जास्त आहे .गिर्यारोहन क्षेत्रातील चिमणी क्लाइंबिंग या ठिकाणी करता येते याच्या साहाय्याने ही मोहीम पूर्ण करता आली या मोहिमेत आम्हाला टेक्निकल सपोर्ट साठी पॉईंट ब्रेक अडव्हेंचर नाशिक या संस्थेची मदत मिळाली .यात जॉकी सर आणि बंन्नी सर यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसेच महिला वॉलियंटर म्हणून अर्चना मॅडम यांनी मदत केली ,तसेच डॉ. समीर भिसे, ओंकार रौंधळ आणि त्याच्या सहकार्याने मदत केली.ही मोहीम जिजाऊ जयंती आणि युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती याना अभिवादन करण्यासाठी केली तसेच कोरोना काळातील जे कोरोना वॊरियर्स याना आम्ही अर्पण करतो आहे.
नांदेड :शंकर नागरी सहकारी बँकेचे खाते असलेल्या आयडीबीआय शाखेतून हॅकर्सनी लंपास केलेले 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये
289 खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 जानेवारी रोजी शंकर नागरी सहकारी बँकेचे व्यवस्थापक विक्रम राजे यांनी तक्रार केली होती. ही चूक आयडीबीआय बँकेची आहे आणि आमचे पैसे परत मिळवून द्यावेत, अशी मागणी केली होती.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेचं नाव काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निश्चित- सूत्र
लातूरमध्ये 62 कोंबड्यांचा मृत्यू. वाढता संसर्ग पाहता सावधगिरी म्हणून 30 पथकं तैनात.
आमदार राम कदम यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपच्या 3 कार्यकर्त्यांना अटक. अटकेनंतर लगेचच आरोपींच्या सुटकेसाठी पोलिसांना फोन. कदमांच्या याच भूमिकेबाबत शिवसेना आक्रमक.
परभणी : परभणीच्या मुरुंबा गावात बर्ड फ्लुनेच 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावातील 1 किलोमीटरच्या परिसरातील उर्वरित साडेसहा हजार कोंबड्यांना आज दुपारी मारण्यात येणार आहे. काल दिवसभर पशुवैद्यकीय विभागाने अनेक विभागांच्या परवानग्या मिळवल्या त्यानंतर या किलिंगसाठी एकुण 7 पथक तयार करण्यात आली असून आरोग्य विभागाकडून पीपीई किट, ग्लोज, मास्क, आदी सर्व साहित्य मिळवून ही सर्व पथकं दुपारी मुरुंबा गावात पोचणार आहेत. यासाठी पाठबंधारे विभागाच्या जेसीबी ही पशुसंवर्धन विभागाने मागितल्या आहेत. या सर्व साहित्यांची जुळवाजुळव केल्यानंतर मुरुंबा गावात या कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत.
पुणे : पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या लोणावळ्यात आठवड्यातून एक दिवस 'सायकल डे'चा उपक्रम राबविला जाणार आहे. सिने अभिनेते सुनील शेट्टीच्या हस्ते उपक्रमाचा श्रीगणेशा झाला. वाहतूक कोंडीमुळं शहरात प्रदूषण वाढतंय, अशीच परिस्थिती कायम राहिली तर इथल्या वैभवाला धक्का बसण्याची शक्यता आहे. परिणामी पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायाला फटका बसण्याची शक्यता आहे.
राजमाता जिजाऊंचा 422 वा जन्मोत्सव आज साजरा करण्यात येत आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा इथे जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात आज सकाळपासूनच जन्मोत्सव कार्यक्रम सुरु झाल आहे. आज सूर्योदयापूर्वी इथल्या ऐतिहासिक राजवाड्यात पुरातत्व विभागाच्या वतीने शासकीय महापूजा बुलढाण्याचे पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते संपन्न झाली. सिंदखेडराजा इथल्या जिजाऊं सृष्टीमध्ये मराठा सेवा संघाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या कार्यक्रमांसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी दिली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दुपारी होणाऱ्या एका छोटेखानी कार्यक्रमात मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मराठा विश्वभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तर जन्मस्थळी मोजक्याच लोकांना मानवंदना देण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंदखेडराजा शहर आणि परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राजमाता जिजाऊंचा 422 वा जन्मोत्सव आज साजरा करण्यात येत आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा इथे जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव राजवाड्यात आज सकाळपासूनच जन्मोत्सव कार्यक्रम सुरु झाल आहे. आज सूर्योदयापूर्वी इथल्या ऐतिहासिक राजवाड्यात पुरातत्व विभागाच्या वतीने शासकीय महापूजा बुलढाण्याचे पालक मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते संपन्न झाली. सिंदखेडराजा इथल्या जिजाऊं सृष्टीमध्ये मराठा सेवा संघाकडून विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या कार्यक्रमांसाठी फक्त 20 लोकांनाच परवानगी दिली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दुपारी होणाऱ्या एका छोटेखानी कार्यक्रमात मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मराठा विश्वभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. तर जन्मस्थळी मोजक्याच लोकांना मानवंदना देण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंदखेडराजा शहर आणि परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोविशील्ड लसीचे डोस घेऊन पहिली गाडी एअरपोर्टला रवाना झाली. पोलिसांनी सीरम इन्स्टिट्यूटपासून एअरपोर्टपर्यंत या वाहनाला सुरक्षा पुरवली. त्याआधी लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पोलिसांकडून पूजाही करण्यात आली. ही लस पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे देशभरात पाठवली जाणार आहे. आज अशाप्रकारची आणखी तीन वाहनं लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. काल केंद्र सरकारने कोविशील्ड लसीचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटकडून आजपासून ही लस पाठवण्यास सुरुवात झाली.
राज्यात बंदी असलेला गुटखा अवैधरित्या गुजरातमधून आयात केला जात असताना तलासरी पोलिसांनी धडक कारवाई केली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरातमधून महाराष्ट्रात अवैधरित्या वाहतूक केला जाणारा गुटखा तलासरी पोलिसांनी ताब्यात घेतला. 16 लाखांचा गुटख्याची एका आयशर टेम्पोमधून वाहतूक केली जात असताना ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोलिसांनी जवळपास 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मागील 15 दिवसात तलासरी पोलिसांची ही दुसरी मोठी कारवाई असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर गुटखा महाराष्ट्रात अवैधरित्या येत असल्याचं समोर आलं आहे. या कारवाईत एक आयशर टेम्पोसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नवी मुंबईतील पाम बीच रोडवर अतिवेगात स्पोर्टस बाईक चालवणाऱ्या तरुणाचा अपघातात जागीच मृत्यू झाला. वेगावर नियंत्रण न राहिल्याने बाईकचा अपघात झाला. मित्राने घेतलेल्या स्पोर्टस बाईकची राईड घेण्यासाठी तळोजावरुन पाम बीच रोडवर आलेल्या स्वप्नील झिंगाडे याचा जीव आपघातात गेला. स्वप्नील हा तळोजा इथे राहणारा असून त्याचा मित्र सचिनने सुमारे दहा लाखांची नवीन स्पोर्टस बाईक घेतली होती. स्वप्नीलने एक राईड घेण्यासाठी म्हणून बाईक हातात घेतली. परंतु वेगावर नियंत्रण न राहिल्याने अपघात झाला असला तरी नेमके काय चुकले याचा शोध पोलीस घेत आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंवर पिंपरी चिंचवडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. हिंदू ( जगण्याची समुद्र अडगळ ) या पुस्तकात एका समाजाबाबत आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप आहे. तशी तक्रार वकील रमेश राठोड यांनी भोसरी स्टेशनमध्ये केली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंवर पिंपरी चिंचवडमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. हिंदू ( जगण्याची समुद्र अडगळ ) या पुस्तकात एका समाजाबाबत आक्षेपार्ह लेखन केल्याचा आरोप आहे. तशी तक्रार वकील रमेश राठोड यांनी भोसरी स्टेशनमध्ये केली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. शशिकुमार चित्रे (वय ८४) यांचे मुंबईत निधन. भारतातील आधुनिक खगोलशास्त्राच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. केम्ब्रिजमधून पीएचडी आणि कॅलटेक येथील संशोधन झाल्यावर १९६७ ते २००१ दरम्यान ते मुंबईच्या टीआयएफआर येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. सूर्य आणि त्याचे चुंबकीय क्षेत्र या विषयामध्ये त्यांचे विशेष संशोधन होते. २०१२ मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते.
कामगार नेते मा. श्री. सुर्यकांत व्यं. महाडिक यांचे अल्पशा आजाराने झेन हॉस्पिटल मध्ये रात्री साडे आठ वाजता निधन झाले. चेंबूर येथे सकाळी सात ते दहा अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवलं जाईल. अंतिमसंस्कार त्यांच्या मूळगावी रत्नागिरी येथे करण्यात येणार आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या विरोधीपक्ष नेतेपदी अमोल शिंदे यांची निवड, महेश कोठे यांच्या पक्षांतरच्या निर्णयानंतर खांदेपालट
मनसेची महत्वाची बैठक
,राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक
,पक्षाचे नेते आणि सरचिटणीस या बैठकीत उपस्थित राहणार
,उद्या 11 वाजता वान्द्र्यातील एमआयजी क्लबमध्ये राहणार उपस्थित
, राज ठाकरे पक्ष नेत्यांसोबत संवाद साधणार
मनसेची महत्वाची बैठक ,
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक ,
पक्षाचे नेते आणि सरचिटणीस या बैठकीत उपस्थित राहणार ,
उद्या 11 वाजता बांन्द्र्यातील एमआयजी क्लबमध्ये राहणार उपस्थित ,
राज ठाकरे पक्ष नेत्यांसोबत संवाद साधणार
कोल्हापूर : गर्भवती महिलेवर पाच जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी केला बलात्कार,
,
कोल्हापुरातील रायगड कॉलनीतील घटना ,

या प्रकरणी एकाला अटक तर बाकीच्या संशयितांचा शोध सुरू ,

पीडित महिलेला आसाम वरून गुंगीचे औषध देऊन कोल्हापुरात आणल्याचा प्रकार ,

मर्जीविरुद्ध पीडितेशी संबंध ठेवल्याची तक्रार,

करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराची घोषणा, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यंदाचे मानकरी, जनस्थान पुरस्कार निवड समितीने केली मधुमंगेश कर्णिक यांची निवड , 1 लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र हे पुरस्काराचे स्वरूप, 10 मार्चला पार पडणार सोहळा, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व विचार करून ठिकाण आणि इतर गोष्टी ठरवल्या जाणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बर्ड फ्ल्यू संदर्भातील बैठक वर्षा निवासस्थानी सुरू
,
बैठकीला पशूसंवर्धन व दूग्धविकास मंत्री सुनील केदार उपस्थित असून त्यांच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत
,
मुख्यमंत्री यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर मंत्री सुनील केदार राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवांद साधणार
एबीपी माझाने बातमी दाखवताच बोर्डाकडून परिपत्रक जाहीर,

दहावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे,
दहावी बोर्ड परीक्षेचे आता ऑनलाइन अर्ज आता 11 जानेवारी नाहीतर 25 जानेवारीपर्यत विद्यार्थ्यांना भरता येणार,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अखेर विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 2020 मध्ये मराठा आरक्षण आणि लॉकडाऊनमुळे ज्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या त्या नवीन वर्षात घ्यायचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ठरवलं आहे. राज्य सेवेची पूर्व परीक्षा जी 11 ऑक्टोबर 2020 रोजी होणार होती ती आता 4 मार्च 2021 ला होईल. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा जी 1 नोव्हेंबर 2020 रोजी होणार होती ती आता 27 मार्च 2021 रोजी होईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब साठीची एकत्रित पूर्व परीक्षा जी 22 नोव्हेंबर 2020 रोजी होणार होती ती आता 11 एप्रिल 2021 रोजी होईल.
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, आता ऑनलाईन पासाशिवाय देखील मिळणार भविकांना दर्शन , ABP माझाच्या बातमीचा दणका, आता रोज 8 हजार भाविक घेऊ शकणार दर्शन
अभिनेता सोनू सूदला हायकोर्टाकडून दिलासा. 13 जानेवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे मुंबई महापालिकेला निर्देश. दिवाणी न्यायालयाने सोनू सूदला दिलासा देत दिलेले निर्देश पुढील सुनावणीपर्यंत कायम. जुहूमधील निवासी इमारतीत बेकायदेशीर बदल केल्याबद्दल सोनूविरोधात महापालिकेची तक्रार
महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक. घाबरुन न जाण्याचं आवाहन.
कृषी कायद्यांना स्थगिती देऊन समिती नेमा. सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला प्रस्ताव. शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं मत.
कृषी कायद्यांना स्थगिती देऊन समिती नेमा. सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला प्रस्ताव. शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचं मोठं मत.
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर पहाटेच्या सुमारास नर्‍हे येथील सेल्फी पॉईंटजवळ एका ट्रकने मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्हीही वाहने साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ,राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
पुणे : मुंबई-बंगळुरू महामार्गावर पहाटेच्या सुमारास नर्‍हे येथील सेल्फी पॉईंटजवळ एका ट्रकने मालवाहतूक करणार्‍या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दोन्हीही वाहने साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने जात होती. अपघातामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा दूरपर्यंत लागल्या होत्या. सिंहगड रस्ता पोलीस ,राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
कोल्हापूरच्या आकनूर गावात महिलेचे पाच तोळे सोन्याचे दागिने पळवले. आनंदी पाटील यांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी हिसकावले. दोन स्थानिकांनी पाठलाग करत चोरट्यांचे फोटो काढले. आता फोटोवरून राधानगरी पोलीस चोरट्यांचा शोध घेणार.
तब्बल सात तासाच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या जंगली गव्याला बाहेर काढण्यात महाबळेश्वर ट्रेकर्स कार्यकर्त्यांना यश आले. काल सायंकाळी सहा वाजता महाबळेश्वरातील लिंगमळा परिसरातील एका विहिरीमध्ये जंगली गवा पडला होता. जवळपास 70 फूटावर पाणी आणि जवळपास दीडशे फूट खोल असलेल्या विहिरीत जंगली गावा पडल्याचे समजल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली. लगेचच रेस्क्यू काम सुरू करण्यात आले. विहिरीची खोली जास्त असल्यामुळे आणि गवा जवळपास अडीच ताणाचा असल्यामुळे गवा बाहेर काढण्यात सहज सोपं नव्हतं. नंतर जेसीबी मागवण्यात आला मात्र जेसीबी चा उपयोग या वेळेला करता आला नाही. अखेर पोकलेन मागून त्याठिकाणी डॉक्टरला बोलावून गव्याला बेशुद्ध करण्याचाही प्रयत्न केला.
पोकलेनच्या साह्याने त्याला पट्ट्याने बांधून त्याला बाहेर काढण्यात यश आले.ज्या वेळेला या गोव्याला बाहेर काढण्यात आले त्यावेळेला त्याने जंगलाकडे धूम ठोकली.गवा जंगलाकडे गेल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यां वाजवून अभिनंदन केले.सात तासाच्या या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सर्वांनी उपस्थित टीमचे टाळ्या वाजून अभिनंदन केले.
औरंगाबाद : पिण्याचं पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायतमधील खुर्च्या भरचौकात जाळल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावातील घटना. ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेवक सरपंच आणि उपसरपंच यांच्या खुर्च्या काही तरुणांनी भर चौकात आणून पेटवून दिल्या. गावात गेल्या आठ दिवसांपासून पाणी मिळत नसल्याने ह्या खुर्च्या पेटवून देण्यात आल्या आहेत.गेवराई पायदा गावाला जवळ असलेल्या पाझर तलावातून पाणी पुरवठा करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावात अशुद्ध पाणी येत होते.
सांगली : सांगलीत ऊस दराच्या एफआरपीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरुच आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे राजारामबापू साखर कारखान्याचे मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील गट ऑफिस पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
परभणी : राज्य अगोदरच कोरोनच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता नवीन संकट उभं राहिलंय, ते बर्ड फ्लूच्या रूपात. परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं असून बीड आणि लातूर मधील अहवाल अद्याप प्रतिक्षेत आहेत. दरम्यान राज्य शासनाने या घटनेनंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रॅपिड रिस्पॉन्स टीम नियुक्त केल्या आहेत.
पुणे : पुणे-बेंगलोर महामार्गावर रावेत येथे अपघात. 1 मृत्यू आणि 9 जखमी. खाजगी बस ने अवजड वाहनाला मागून ठोकर दिल्याने हा अपघात झाला. पहाटेची घटना. देहूरोड पोलीस आणि अग्निशमन दलाने जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे.
पुणे : पुणे-बेंगलोर महामार्गावर रावेत येथे अपघात. 1 मृत्यू आणि 9 जखमी. खाजगी बस ने अवजड वाहनाला मागून ठोकर दिल्याने हा अपघात झाला. पहाटेची घटना. देहूरोड पोलीस आणि अग्निशमन दलाने जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे.
गोंदिया : ग्रामपंचायत निवाडणुकीच्या तोंडावर गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या भरनोलीच्या जंगलात नक्षल्यांनी पुरुन ठेवलेली स्फोटके पोलिसांनी जप्त केली. अज्ञात माओवाद्यांविरोधात गुन्हा दाखल घातपाताचा डाव पोलिसांनी उधळला. जर्मनच्या 10 किलोच्या डब्यात लोखंडी खिळे, काच, वायर, काळी विस्फोटक पावडर यात आढळले.
मुंबईतील बोरिवली पूर्वेत मागाठाणेमध्ये असलेला एचपी पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काल रात्री आठच्या सुमारास मागाठाणे इथल्या एचपी पेट्रोल पंपवर पेट्रोल भरायला आलेल्या दुचाकीस्वार आणि कर्मचाऱ्यांमध्ये पैशांवरुन वाद झाला. या वादातून पेट्रोल पंपाच्या आठ ते दहा कर्मचाऱ्यांनी दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केली. तो दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बोरिवली पूर्व कस्तुरबा मार्ग पोलिसांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन पेट्रोल पंपच्या काही कर्मचाऱ्यांचा अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत. काही महिन्यांपूर्वी बोरिवली पूर्वेत दोन पेट्रोल पंपांवर अशाच पद्धतीने कर्मचाऱ्यांनी पाच रुपयांसाठी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली होती, ज्यात दोघांचा मृत्यू झाला होता. बोरिवली पूर्वेतील पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या अशा गुंडगिरीमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
औरंगाबाद -

वाराणसीहून शहरात आलेल्या एका 16 वर्षीय मुलीला एकटे पाहून तिघांचा सामूहिक बलात्कार, रेल्वेस्थानक परिसरतील घटना, पीडित मुलगी वाराणसी येथील रहिवासी असल्याची माहिती, सोबत आलेल्यांनी तिला एकटे शहरात सोडले होते, त्यानंतर ही घटना घडली, रात्री उशिरा पीडितेची घाटी रुग्णालयात करण्यात आली वैद्यकीय तपासणी, काही वेळापूर्वी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
वाराणसीहुन शहरात आलेल्या एका 16 वर्षीय मुलीला एकटे पाहून तिघांचा सामूहिक बलात्कार. रेल्वेस्थानक परिसरतील घटना. पीडित मुलगी वाराणसी येथील रहिवासी असल्याचे सांगते. सोबत आलेल्याने तिला एकटे शहरात सोडले होते. त्यानंतर ही घटना घडली. रात्री उशिरा पीडितेची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. काही वेळापूर्वी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल.
सोलापूर-
ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून संचारबंदीचे आदेश,

मंदिर परिसरातील काही भागात 12 ते 16 जानेवारी दरम्यान राहणार संचारबंदी ,

परिसरात राहणाऱ्या लोकांनी रहिवाशी पुराव्यासह संबंधित पोलीस ठाण्याकडून पासेस बनवून घेण्याचे आदेश ,

अत्यावश्यक सेवा, पासेसधारक व्यक्ती यांच्याव्यतिरिक्त इतर नागरिकांना परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव,

संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश,
बुलढाणा जिल्ह्यातिल सिंदखेड राजा पोलिस स्टेशनच्या हद्दित रात्री 12.00 पासून कलम 144 लागू. मध्यरात्री पासून सिंदखेड राजाला येणारे सर्व रस्ते पुढील दोन दिवस वाहतुकीसाठी बंद असणार. जिजाऊ जन्म उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 11 व 12 रोजी कलम 144 लागू. कोरोनाच्या नियमानुसार जिजाऊ जन्म उत्सवाच्या कार्यक्रमासाठी फक्त 20 लोकांना परवानगी. नागरिकांनी सिंदखेड राजा परिसरात जमाव करू नये, सिंदखेड राजा पोलिसांचं अवाहन.
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत रात्री 12 वाजेपासून कलम 144 लागू, मध्यरात्री पासून सिंदखेड राजा येणारे सर्व रस्ते पुढील दोन दिवस वाहतुकीसाठी बंद असणार, जिजाऊ जन्म उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 11 व 12 रोजी कलम 144 लागू, कोरोनाच्या नियमानुसार जिजाऊ जन्म उत्सवाच्या कार्यक्रमासाठी फक्त 20 लोकांना परवानगी, नागरिकांनी सिंदखेडराजा परिसरात जमाव करू नये, पोलिसांचं अवाहन
भंडाऱ्यातील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांची बांधकाम तसेच अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येऊन फायर ऑडिट करण्यात यावे तसेच सर्व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्याना केल्या आहेत. एबीपी माझानेही आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील फायर सेफ्टीचा रिअलिटी चेक केला असता 2018 सालानंतर इथे फायर ऑडिट केले गेलेले नाही. यासोबतच फायर सेफ्टीच्या दृष्टीने ईथे कुठलीच कामे झाली नसल्याच समोर आलं होतं.
चॉकलेटचे आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलीला पळवून नेलं,

तीन पैकी एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची पोलिसांची माहिती,

सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धक्कादायक घटना

गुन्हा दाखल झाल्याच्या 24 तासात पोलिसांनी घटना आणली उघडकीस,

21 वर्षीय आरोपी जयेश राजू ऊर्फ राजेश गायकवाड यास अटक ,

आरोपीविरोधात या आधी देखील चोरी, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल
सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ११ जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.

सोमवारी सायंकाळी ५ वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाबाबत येत्या २५ जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते. त्यानुसार राज्य सरकार आपल्या रणनितीवर अंतिम हात फिरवत असून, आजवर झालेल्या तयारीची समिक्षा केली जाते आहे.
नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलिस ठाण्यात 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकूचा धाक दाखवून अत्याचार केल्याची तक्रारीत नोंद करण्यात आलीय. 7 आरोपींमध्ये 2 अल्पवयिन मुले आणि एका मुलीचाही समावेश आहे.
सोलापुरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेतील योगदंडाची पूजा, गंगास्नान आणि केळवणचा कार्यक्रम मानकारीच्या उपस्थितीत पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनाने यात्रेवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे केवळ मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सिद्धरामेश्वर यांच्यायात्रेतील प्रमुख धार्मिक विधी ह्या 12 ते 16 जानेवारी दरम्यान असतात. मात्र तत्पूर्वी जे धार्मिक विधी आहेत त्यांची सुरुवात आज झाली. आज शेटे वाड्यात योगदंडाला गंगा स्नान घालून पूजा केली जाते. त्यानंतर आलेल्या सर्व मानकऱ्यांना प्रसाद दिले जाते. प्रशासनाने काही यात्रेबाबत निर्बंध घेतले असले तरी यात्रेचा उत्साह मात्र कायम आहे
राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात
मुंबई महानगरपालिकेला दोन आयुक्त नकोत अशी सष्ट भुमिका शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी सष्ट केलीय. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधला दुरावा समोर आलाय. मुंबईचे पालकमंत्र्यांनी मुंबईला दोन आयुक्त असावेत अशी मागणी केली होती. त्यावर खासदार विनायक राऊत यांनी भुमिका सष्ट केलीय. मुंबई महानगरपालिका हे एक क्षेत्र, मुंबईला एकच आयुक्त पुरेसा आहे. मुंबईचा एकछत्री कारभार चांगल्या पद्धतीने व्हायचा असेल तर एकच आयुक्त योग्य असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी सष्ट केलं. दोन आयुक्त करावेत अशी मागणी काही जणांनी या आगोदर केली होती. या मागणीला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन आयुक्तांचा कन्सेप्ट पसंत पडणार नाही असं मत देखिल विनायक राऊत यांनी सष्ट केलं.
बीडमध्ये दोन दिवसात तब्बल 22 कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटना बीडच्या पाटोदा तालुक्यातील भूगाव येथे घडली आहे. शुक्रवारी 15 कावळे आणि काल शनिवारी सात कावळ्यांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कावळे मृत आढळल्याची ही घटना बीड जिल्ह्यातली पहिलीच आहे. कावळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्टच आहे. घटनास्थळी वन विभागाचे पथक दाखल होऊन या मृत्यूची शहानिशा करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापि कावळ्यांचा मृत्यू कसा झाला हे समोर आलं नाही. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वन्यप्रेमी च्या मदतीने या कावळ्याना परिसरातील जंगलात खड्डा करून पुरण्यात आले आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस मार्गावर बसचा अपघात झाला असून दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. चाकणहून विरारच्या दिशेने निघालेल्या बसने पुढच्या वाहनाला धडकल्याने अपघात झाला आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास बोरघाटात हा अपघात झाला आहे. दोन गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आलं आहे
पालघर- पालघर मधील अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिकेची हत्या, साधना चौधरी यांचा मृतदेह पतपेढीच्या कार्यालयात आढळला, पालघर पोलीस घटनास्थळी दाखल , तपास सुरू
पालघर शहरात शुक्ला कंपाऊंड परिसरामध्ये 52 वर्षीय महिलेचा खून. ओम शांती देवा अपार्टमेंटमध्ये असलेल्या पतपेढी कार्यालयाच्या संचालिका साधना रामकृष्ण चौधरी असे महिलेचे नाव. श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी संस्थेच्या कार्यालयातच घडली घटना. रक्तरंबाळ अवस्थेत महिला कार्यालयात आढळली. खून करून अज्ञात आरोपी फरार. कार्यालयात काम करताना संध्याकाळच्या सुमारास खून. पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या दुपारी १२ वाजता भंडारा जिल्ह्यातील दूर्घटनाग्रस्त हाँस्पिटलची पहाणी करणार. तसेच नवजात बालकं गमावलेल्या पालकांचे सांत्वन करून त्यांना दिलासा देणार.'
डोंबिवली ग्रामीण सह ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची 1800 मिमी व्यासाची पाईप लाईन कल्याण शीळ महामार्गालगत देसाई गावाजवळ जवळ फुटल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेईल दुरुस्तीचे काम हाती घेतले मात्र शुक्रवारी दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आलेला असतानाच आज पुन्हा पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना सलग दोन दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
नाशिक शहरासह ग्रामीण भागात पावसाची हजेरी, अर्ध्या तासापासून शहरातील काही भागात मुसळधार पाऊस,

ग्रामीण भागालाही पावसाने झोडपले, शहरात नागरिकांची तारांबळ उडाली तर ग्रामीण भागात शेतीचे नुकसान
राहुल गांधी मायदेशी परतल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदाचा निर्णय होणार. महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचं नाव आघाडीवर. राहुल गांधी 11 जानेवारीला देशात परतण्याची शक्यता. त्यामुळं हा निर्णय लांबणीवर पडण्याची स्पष्ट चिन्हं दिसत आहेत.
16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार
औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांचा टोला. संभाजीनगर नव्हे, तर औरंगाबादच म्हणू असं म्हणणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसणं तुमच्या सेक्युलरिझममध्ये बसतं का, शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
कोल्हापुरातील फुटबॉलपटू प्रणव भोपळेने दुसऱ्यांदा जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. फुटबॉलसारख्या खेळायला करिअर बनवणाऱ्या प्रणवने वर्षभरात दोनदा विक्रम केले आहेत. प्रणवने नाक आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स करण्याचा विक्रम केला आहे, असा विक्रम करणारा प्रणव हा जगभरातील एकमेव खेळाडू ठरला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे जगभरातील विक्रमांची नोंद घेतली जाते. यामध्ये आता प्रणवच्या आगळ्यावेगळ्या विक्रमाची देखील नोंद झाली आहे. प्रणवने एक मिनिटात 81 वेळा नाकावर आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स केला. गेल्या तीन वर्षांपासून प्रणव हा फ्री स्टाइल फुटबॉलचा सराव करत आहे. सोबतच अनेक तंत्र हा आत्मसात करत आहे. लॉकडाऊनच्या काळात अधिक मेहनत घेऊन प्रणवने लागोपाठ दोन विक्रम नोंदवले आहेत.
औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीवरुन उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर आनंद झाला. येत्या 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं ही विनंती, असं शिवसेना नेते चंदक्रांत खैरे म्हणाले. राष्ट्रवादीचा याला विरोध नाहीच. कॉंग्रेसही विरोध करणार नाही. या मुद्द्यावरुन आघाडीमध्ये काहीही मतभेद होणार नाहीत. मध्यवर्ती निवडणुका तर शक्य नाही. एमआयएमच्या विरोधाला आम्ही घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावा यासाठी चार स्मरण पत्र लिहिले आहे. त्यांची उत्तर देखील आली असल्याचा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला.
मुंबईतल्या वांद्रे आणि चेंबूर परिसरात एनसीबी छापेमारी सुरु, तीन ठिकाणी छापेमारी सुरु. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी धाडसत्र सुरुच.

सीरमच्या लसीच्या वितरणाला विलंब. लसीचे कंटेनर सोमवारी रवाना होणार.
भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेत दोषी आढळल्यास कठोर कारवाई करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तात्काळ ऑडिट करण्याचेही निर्देश .

सफला एकादशीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर सजलं. मंदिरातील विविध रंगांची आकर्षक फुलं भाविकांना आकर्षित करत आहे. 2021 मधील ही पहिलीच एकादशी आहे. आजच्या दिवशीचे व्रत आचरल्यास हाती घेतलेल्या कामात यश मिळते. अशी अख्यायिका असल्याने भाविक माऊलीच्या चरणी विविध साकडं घालतली जात आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये महिलेने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. काल संध्याकाळी ही घटना घडली. परवीन गोतमवाड असं 26 वर्षीय आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. ही महिला शेनगाव इथे राहते आणि तिचा शेजाऱ्यांसोबत किरकोळ वाद झाला होता. याची तक्रार द्यायला ती महिला पतीसोबत पोलीस स्टेशनमध्ये आली होती. पोलिसांनी चौकशी करुन दोन्ही पक्षावर गुन्हे दाखल करतो असं सांगितलं. पतीवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून महिलेने उंदीर मारण्याचे औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.
हिंसा आणखी भडकण्याचा धोका लक्षात घेऊन ट्विटरकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट कायमस्वरुपी बंद, अमेरिकेच्या संसद परिसरातील हिंसाचारानंतर ट्विटरचं पाऊल

नागपूर : छर्रे असलेली बंदुकीतून फायर होऊन एकाचा मृत्यू,

नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत दाभा परिसरातली घटना,

एक मित्र दुसऱ्या मित्राला छर्रे वाली बंदुक दाखवत असताना चुकून फायर होऊन ही घटना घडली,

लोकेश गजभिये असं मृतकाचे नाव
पालघरमध्ये चोरी करुन पळालेल्या दोन चोरांना झारखंडच्या साहिबगंजमधून अटक करण्यात आली आहे. या चोरांकडून पोलिसांनी ३२५ ग्रॅम सोने, आणि साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच, अधिक तपास सुरू आहे.
#BREAKING रायगडमध्ये कुडपान गावात वऱ्हाडाचा ट्रक 300 फूट खोल दरीमध्ये कोसळला, 30 ते 40 प्रवासी जखमी अवस्थेत असून आतापर्यंत चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील 70 वर्षीय शेतकर्‍याने अज्ञात कारणावरून शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
वऱ्हाडाचा ट्रक दरीत कोसळला, चार मृतदेह बाहेर काढले, सुमारे तीनशे फूट ट्रक खोल दरीत, अनेक जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती , घटनास्थळाकडे पोलादपूर आणि पोलीस ट्रेकर्स रवाना, रायगड जिल्ह्यातील कुडपान येथील घटना
संपूर्ण महाराष्ट्रात हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ठिक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहेत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे मागील काही दिवसांपासून सर्वञ ढगाळ वातावरण दिसून आले असतानाच माञ काळ सायंकाळी शहापूर शहरा सोबतच विविध ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू झाली आज माञ सकाळीच पावसाने जोरदार सुरुवात केली तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले माञ विट उत्पादक व भाजीपाला पिके घेणारे शेतकरी माञ संकटात सापडले आहेत मोठ्या प्रमाणावर शहापूर तालुक्यात भाजीपाला पिके घेतली जातात अवकाळी पावसामुळे आता शेतकरी अडचणीत सापडला आहे
माढा तालुक्यातील बारालोणी येथे आरोपी पकडायला गेलेल्या पोलिसांवर दगडफेक करीत 25 ते 30 लोकांनी आरोपीला सोडवून नेलं, पोलिसांची गाडी फोडली. 100 पोलिसांचा फौज फाटा घेऊन अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे बारलोणीकडे रवाना झाले होते. शंकर गुंजाळ नावाच्या कुख्यात आरोपीला गावातील काही लोकांनी सोडवून नेलं आहे.
भिवंडी : मागील दीड महिन्यांपासून भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका सात वर्षीय मुलाचा मृतदेह समरुबाग कंपाऊंडच्या एका इमारतीतील पाण्याच्या टाकीत आढळून आलंय. आहत ताजुद्दीन फारुकी असं मृत मुलाचं नाव असून तो 25 नोव्हेंबरला बेपत्ता झाला होता. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान या परिसरात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा चेंडू पाण्याच्या टाकीत पडला असता. ही घटना उघड झाली आहे. नागरिकांनी मृतदेह बाहेर काढला असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय. आता भोईवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सात वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय.
सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख पुरषोत्तम बरडे यांनी दिली आहे. महेश कोठे यांनी ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती काल स्वत: एबीपी माझाशी बोलताना दिली होती. आज सकाळी 11 वाजता मुंबईत हा प्रवेशाचा कार्यक्रम होणार होता. मात्र सुत्रांच्या माहितीनुसार महेश कोठे यांचा राष्ट्रवादीत होणारा प्रवेश देखील लांबणीवर पडला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याने महेश कोठे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान महेश कोठे यांची हकालपट्टी कोणाच्या आदेशाने करण्यात येत आहे? लिखीत स्वरुपात प्रदेश पातळीवरुन कोणते लिखित आदेश आले आहेत का? अशा प्रश्नांची पत्रकारानी पत्रकार परिषदेत सरबत्ती केली. मात्र वरीष्ठांच्या आदेशानुसारच आपण ही माहिती जाहीर करत आहोत. 2 ते 4 दिवसात अधिकृत पत्र किंवा मुखपत्र सामनातून जाहीर करण्यात येईल. अशी माहिती देखील जिल्हाप्रमुख पुरषोत्तम बरडे यांनी दिली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या कार्य़कर्त्यांसोबत जुळवून घ्या असे आदेश कार्य़कर्त्यांना दिले होते. असे असताना देखील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे महेश कोठे राष्ट्रवादीत यावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती देखील बरडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
94 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला होणार.. साहित्य महामंडळाची घोषणा.. नाशिकच्या लोकहिवादी संस्थेकडे साहित्य संमेलनाचं आयोजन.. मार्च महिन्याच्या अखेरीस होणार मराठी साहित्य संमेलन
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या शारदा गणेश मंदिरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मंदिरात घुसलेल्या चोरट्यांनी 20 ते 25 तोळे सोन्याचे दागिने अन् रोख रक्कम चोरून गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शारदा गणेश मंडळ हे पुणे शहरातील प्रमुख मंडळापैकी एक गणेश मंडळ आहे. अनेक पुणेकरांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिरात चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
भाजप सरकार सत्तेत असताना सरपंच, नगराध्यक्षपदासाठी थेट निवडणुका घेतल्या. आता निवडून आलेल्या सदस्यांमधूनच सरपंचपदाची निवड होणार आहे. यापूर्वी सरपंचपदासाठी जाहीर केलेले आरक्षण आयोगाने रद्द तात्पुरते स्थगित केले होते. आता ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी दि. २२ जानेवारी नंतर आरक्षण सोडत होणार असल्यामुळे सगळ्यांचे लक्ष नव्याने होणाऱ्या आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाआहे.कोरोनासंसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत.
अभिनेत्री कंगना रनौतपुढील अडचणी आणखी वाढत्या. कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा. कंगना पोलिसांसमोर हजर राहणार का, हा मोठा प्रश्न.

उल्हासनगर मधील खेमानी रमाबाई आंबेडकर नगर मधील महिलांना पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. दरम्यान हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. बुधवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगरमध्ये काही गुंडांनी हातात तलवारी घेत घरासह गाड्यांवर दगडफेक केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी 9 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस या परिसरात मोठा फौज फाटा घेऊ दाखल झाले. चौकशी करत असताना काही महिलांनी विरोध केल्याने या महिलांना पोलिसांकडून मारहाण केल्याची घटना घडली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. दरम्यान या परिसरातील महिलांनी पोलिसांनी विनाकारण आम्हाला मारहाणं केल्याचा आरोप केला, तर पोलिसांनी मात्र आरोपी पकडण्यास गेलो असता काही ठिकाणी विरोध झाला त्यावेळी हा प्रकार घडला असावा असे सांगत पुढे काही बोलण्यास नकार दिला. मात्र या घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धती वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
यवतमाळ : बर्ड फ्लू आजाराबाबतवन विभाग काय पावलं उचलावी याबाबत वन विभागाने एक गाईडलाईन तयार केली आहे. वन क्षेत्रात कुठला बाहेरून आलेला पक्षी मृत अवस्थेत आढळला तर त्याला कसं हाताळायचं आणि अन्य सूचना त्या गाईडलाईनमध्ये आहेत. शिवाय मध्यप्रदेश लगत असलेल्या मेळघाट भागात विशेष काळजी घेण्याच्या सूचना क्षेत्रीय वन प्रबंधकांनी दिल्या आहेत. अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
परभणी : परभणीच्या मंठा-जिंतुर महामार्गावरील चारठाणा शिवारात एक ट्राव्हेल्स जळून खाक झाल्याची घटना घडली असुन या ट्राव्हेल्स मध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र आग कशी लागली हे मात्र स्पष्ट झाले नाही. आज सकाळी काही इतर प्रवासी महामार्गावरून जात असताना ट्रॅव्हल्सला आग लागल्याचे लक्षात आले यावेळी काही जणांनी पोलिसांना याची माहिती दिली. ही पुर्णपणे जळाल्याने ही नेमकी कोणत्या कंपनीची होती. इथे का थांबली होती,आणि आग कुणी लावली हे मात्र कळु शकले नाही. दरम्यान घटना कळल्या नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
युकेच्या कोरोना व्हायरस व्हॅरिएंट अर्थात कोरोनाच्या नव्या प्रकाराचा संसर्ग झालेले आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण महाराष्ट्रात असल्याचं आढळून आले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली.
पालघर : जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागांत पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने आंब्याचा मोहरही करपू लागला आहे. तर बागायती शेतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यातील अनेक भागांत सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन जानेवारीत अवकाळी पावसानं लावलेल्या हजेरीमुळे बळीराजाची चिंता वाढली असून वातावरण बदलाचा हापूस आणि काजू पिकाला बसणार मोठा फटका बसणार आहे.

पार्श्वभूमी

दिवसभरातील ताज्या घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


बर्ड फ्लूबाबत अफवा अन् चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने योग्य माहिती द्यावी : मुख्यमंत्री
बर्ड फ्लूसंदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरु नये यासाठी प्रशासनाने नागरिकांना योग्य व वस्तुनिष्ठ माहिती द्यावी. माणसांमध्ये या रोगाचे संक्रमण होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. बर्ड फ्लू संदर्भांत राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. ठाकरे यांनी बर्ड फ्लू संदर्भात आढावा घेवून नंतर लगेचच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व्हीसीद्वारे बर्ड फ्लू संक्रमण आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात निर्देश दिले. या संदर्भातील निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. या रोगाचे तात्काळ निदान होण्याकरीता राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागासाठी जैवसुरक्षास्तर 3ही अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी. ज्या भागात बर्डफ्लू रोगाची लागण नाही अशा भागात अंडी व मांस 70 डीग्री पेक्षा जास्त तापमानात शिजवून खाल्ल्यास काहीही धोका नसल्याचे नमूद करून याबाबत गैरसमज व अफवा पसरविण्यात येवू नयेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


लसीकरणाबाबत अफवा पसरु नये, राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, पंतप्रधान मोदींच्या सूचना
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यामध्ये त्यांनी कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा केली. तसेच लसीकरणाबाबत अफवा पसरु नये याची राज्य सरकारांनी काळजी घ्यावी, असं देखील सांगितलं आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. या संवादात मोदी म्हणाले की, या लसीकरण अभियानात लस देणाऱ्यांची ओळख आणि मॉनिटरिंग सर्वात महत्वाची आहे. त्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करत को-विन नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील बनवला आहे.


हिंगणघाटच्या प्राध्यापिका जळीत कांडप्रकरणी तीन जणांची साक्ष नोंद
राज्यभर गाजलेल्या हिंगणघाट येथील प्राध्यापिकेच्या जळीतकांड प्रकरणाच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरूवात झाली आहे. हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. माजगावकर यांच्या न्यायालयात तीन जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. हिंगणघाट येथे विक्की उर्फ विकेश नगराळे याने प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलं होतं. उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी विकेश नगराळेवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. या प्रकरणाची सुनावणी हिंगणघाट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होत आहे. शासनाच्या वतीने फिर्यादी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला आहे.


हनुमा विहारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतून बाहेर
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंच्या फिटनेसची समस्या वाढत चालली आहे. सिडनीतील ड्रॉ केलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्याचा हिरो हनुमा विहारी हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे ब्रिस्बेनमधील चौथा कसोटी सामना खेळू शकणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सामन्यानंतर विहारीला स्कॅन करण्यासाठी नेण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत त्याचा अहवाल अपेक्षित आहे. येत्या 15 जानेवारीपासून सुरू होणार्‍या पुढील सामन्यापर्यंत विहारी फिट होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे. हनुमा विहारीने आर अश्विनच्या साथीने 161 चेंडूत 23 धावा करून सिडनी कसोटी ड्रॉ करण्याची महत्वाची भूमिका निभावली. विहारीच्या जागी पर्याय म्हणून रिद्धिमान साहाला स्थान दिलं जाऊ शकतं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.