पिंपरी : आईला मारहाण आणि शिवीगाळ करुन त्रास देणाऱ्या मामाची भाच्याने हत्या केल्याची घटना पिंपरीत घडली आहे. भाच्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने कुऱ्हाडीने वार करत मामाची निर्घृण हत्या केली.


अबुद्दीन शेख (वय 35 वर्ष) असं मृत मामाचं नाव असून अन्वर शेख (वय 19 वर्ष) असं भाच्याचं नाव आहे.

पिंपरीत काल (मंगळवार) रात्री 11.30 वाजता कासारवाडीमध्ये इथे ही घटना घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी भाचा अन्वर शेखसह आकाश गौतम शिंदे आणि अंकुश मल्लेश गायगोळे यांना अटक केली आहे.

मामा अबुद्दीन शेख आईला मारहाण तसंच शिवीगाळ करुन त्रास देत असे. त्याचाच राग मनात ठेवून अन्वर शेखने कुऱ्हाडीने मामाची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं.