ST workers protest : "राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या निवास्थानी झालेल्या आंदोलनातील आंदोलक हे एसटी कर्मचारी होते का? याची चौकशी पोलीस करतील. त्यामुळे या घटनेबाबतचे सत्य लवकरच पुढे येईल. परंतु, राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता आजच्या हल्ल्याला प्रत्यूत्तर देणार नाही. 'तुम्ही शांत राहा, असे शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना निरोप दिला आहे. त्यामुळे आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं उलट उत्तर दिलं जाणार नाही. आम्ही या हल्ल्याचा धिक्कार करतो. परंतु, हा धिक्कार लोकशाही मार्गाने करू, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या  निवास्थानी आज एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेत निवास्थानी घूसून चप्पल फेक केली.  या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसोबत संवाद साधत राष्ट्रवादी याला प्रत्यूत्तर देणार नाही, अशी माहिती दिली आहे. 


जितेंद्र आव्हाड म्हणाले, "या हल्ल्याप्रकरणी कायदा आपलं काम करेल. राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता याला प्रत्यूत्तर देणार नाही. शरद पवार यांनी आम्हाला तसा निरोप दिला आहे. शिवाय काही झालं तरी आपण एसटी कामगारांसोबत आहोत, असे शरद पवार यांनी आम्हाला सांगितले आहे. एसटी कर्मचारी कामावर नसताना आज राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती दूर करून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू.  शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. असा हल्ला करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही."  


अज्ञात शक्तींनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ते म्हणाले, काल न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचा विजय झाला म्हणून आनंद साजरा करण्यात आला. परंतु, न्यायालयाच्या निकालाला 12 तास होण्याआधीच कर्मचाऱ्यांनी आज शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. अज्ञात शक्तींनी एसटी कर्मचाऱ्यांची डोकी भडकवली आहेत. आम्हाला कायदा तोडून काहीच करायचे नाही. आम्ही लोकशाही माणणारे आहोत. महाराष्ट्राची जणता हे कधीच सहन करणार नाही." 


"शरद पवार यांच्या निवास्थानावर झालेला हल्ला म्हणजे महराष्ट्राच्या राजकीय संस्कृती अपमान आहे. महराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत मतभेत होते परंतु, मनभेद कधीच नव्हते. गेल्या 50 वर्षांपासून शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्त केले आहे. एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात नेतृत्व गेले की काय होतं हे आज जनतेने पाहिलं आहे. राजकारणात विरोध करणाऱ्यांचा सन्मान करायचा असतो, अशी शिकवण शरद पवार यांनी आम्हाला दिली आहे. आज त्यांच्या घरी ते स्वत:, त्यांची पत्नी आणि नात हे तिघेच घरात असताना असा क्रूर हल्ला करण्यात आला. हे महाराष्ट्राचं दुर्देव आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.



महत्वाच्या बातम्या


ST Workers Protest: सुप्रिया सुळे चर्चेसाठी आल्या पण कर्मचारी आक्रमक


ST Workers Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक; एसटी कर्मचारी आक्रमक


ST Workers Protest Live : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण? याचा शोध घेणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती