मुंबई : नारायण राणेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत, महाविकाआघाडीवर निशाणा साधला आहे. जुहू येथील 'अधिश' बंगला नियमानुसार आहे. फक्त टेरेसवर भाज्या लावल्या तरी महापालिकेने ते बेकायदेशीर ठरले. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री 2 हे अनाधिकृत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे. 


नारायण राणे म्हणाले,  जुहू येथील माझा बंगला नियमानुसार आहे. फक्त टेरेसवर भाज्या लावल्या तरी महापालिकेने ते बेकायदेशीर ठरवलं.मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मातोश्री 2 हे अनाधिकृत होते तरी देवेंद्र फडणवीसांनी त्याला मंजूरी दिली. महापालिका अधिकारी पैसे कमवत आहेत. त्यांची नावं मी सीबीआयला देणार आहे. मातोश्री 2 अनधिकृत होतं पण देवेंद्र फडणवीस यांनी ते मंजूर केलं, त्यांचे आभार मानले पाहिजे. राणेंच्या केससाठी मोठे वकील दिले, पण मराठा आरक्षणावर वकील दिले नव्हते.  मी साहेबांचा चेला आहे घाबरणार नाही पुरून उरेल, असे नारायण राणे म्हणाले. 


 राज्य चालवण्यास महाविकासआघाडी असमर्थ


राज्य चालवण्यास हे लोक असमर्थ आहेत.  हे लोक राज्य चालवायला असमर्थ आहे. सध्या  ऐन उन्हाळ्यात राज्यात विजेचा तुटवडा होत आहे त्यावर काय?  याआधी लोडशेडिंग नव्हते मग आताच का? कारण  800 कोटींची थकबाकी कोळसा कंपन्यांची महाराष्ट्र सरकारने दिली नाही.  अंधारात कुणाला रहावे लागेल जनतेला या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल करत नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.  


फ्लॅट जप्त केला म्हणून कार्यकर्ते नाचत होते का?


देवेंद्र फडणवीस, किरीच सोमय्या एकटे नाहीत. देशात  जगात भाजप मोठा पक्ष आहे.  भाजपची देशात सत्ता आहे, राज्यात 105 आमदार आहेत.  तुमचे 56 आहेत पुढच्या वेळी निम्मेही येणार नाहीत. काल संजय राऊतांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते नाचत होते, फ्लॅट जप्त झाला म्हणून नाचत होते का?  असे म्हणत कालच्या संजय राऊताच्या कालच्या शोभायात्रेवर नारायण राणेंनी टीका केली आहे.


संजय राऊत तुम्ही एकटे आहात 


संजय राऊत यांच्या कारवाईनंतर त्यांच्या स्वागतसाठी कोणती जनता संजय राऊत सोबत रस्त्यावर उतरली. एकही आमदार नव्हता फक्त एक खासदार दिसत होता. जो नेता उपस्थित होता तो पगारधारी आहे. त्यामुळे संजय राऊत तुम्ही एकाकी पडले आहे. 


जाधवांकडे मिळालेल्या प्रश्नाचे उत्तर शिवसेनेकडे नाही


यशवंत जाधव यांच्याकडे जे पैसै मिळाले याचे उत्तर कोणाकडे नाही. शिवसेना प्रमुखांकडे देखील या प्रश्नाचे उत्तर नाही. पैसे खाणे हा शिवसेनेचा धर्म आहे. या सर्व मुद्यांकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी संजय राऊत रोज काहीना काही आरोप लावत आहे. जाधवांकडे मिळालेले पैसे हे मुंबईतील जनतेच्या कराचे पैसे आहे. शिवसेनेने अनेक वेळा वेगवेगळ्या आंदोलनासाठी पैसे गोळा केले आहे. त्याचा हिशोब कधी पक्षाने दिला आहे का? असा प्रश्न नारायण राणेंनी यावेळी उपस्थित केला आहे.