ST Workers Protest : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आज आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने याचे गंभीर पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
बुधवारी हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निकाल देताना सर्व कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश दिले होते. तर, सरकारने कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश दिले. एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतील असे म्हटले जात असताना आज अचानकपणे एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या आवारात आक्रमक आंदोलन केले. यावेळी कर्मचाऱ्यांनी निवासस्थान परिसरात घुसले.
दरम्यान, सरकरवर कर्मचारी नाराज झाल्याने हे आंदोलन करण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे भरकटलेलं असल्याची प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांची याचिका निकाली
एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. आज हायकोर्टाच्या निकालाची प्रत जारी करण्यात आली. कामगारांनी 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू व्हावं, असं कोर्टानं सांगितलं आहे. कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
ST Workers Protest Live : विश्वास नांगरे पाटील आंदोलनस्थळी दाखल