मुंबई : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, आज 70 लोकांना माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवार गटाला (Ajit Pawar)  ठणकावलं. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर माझी निवड योग्य नाही म्हणता, पण त्या पत्रावर तुमच्याच सह्या आहेत असाही टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या विस्तारित कार्य समितीती आज दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये बैठक पार पडली. 


शरद पवार म्हणाले की, पक्षाचं चिन्ह त्यांना मिळेल असा त्यांचा दावा आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय काही आला तरी चिंता करण्याच कारण नाही. पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आपल्या बाजूने लागेल. देशाचं राजकारण बदलतय. आज अनेक राज्यात भाजपाचं सरकार नाही. काही राज्यातील विरोधी पक्षाची सरकारं पाडून अनेक ठिकाणी भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. 


Sharad pawar on Ajit Pawar : भाजपने वॉशिंग मशिन चिन्ह घ्यावं


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपवर टीका करताना म्हणाले की, आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत. भाजपने ज्यांच्यावर आरोप केलेत त्यांना सोबत घेतलं. त्यामुळे भाजपने आता त्यांच्या पक्षाचं कमळ हे चिन्ह बदलावं आणि वॉशिंग मशिन घ्यावं. 


अनिल देशमुख, संजय राऊत अटकेवरुन शरद पवारांनी भाजपवर सडकून टीके केली. भाजप ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत अनेकांना चुकीच्या पद्धतीने त्रास दिला. मणिपूरमध्ये कित्येक महिने हिंसाचार सुरू असताना त्यांनाी तिकडे जावसं वाटलं नाही असं ते म्हणाले. 


आज शरद पवार गटाकडनं दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये  कार्य समितीची एक बैठक सुद्धा बोलवण्यात आलेली आहे. निवडणूक चिन्ह गोठवलं गेलं किंवा जर आपल्या विरोधात निर्णय आला त्याचे काय विपरीत परिणाम होणार? पुढे नेमके कोणते पाऊल उचलायचे  हाच या बैठकीचा  अजेंडा हा असणार आहे. 


उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी


राष्ट्रवादी फुटीसंदर्भात 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगात उद्या दुपारी 3 वाजता राष्ट्रवादी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करणार आहेत. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून तब्बल आठ ते नऊ हजार शपथपत्र दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. 


ही बातमी वाचा: