पुणे : पुण्यात गुन्हेगारांच्या टोळींचा (Pune Crime News) धुमाकूळ सुरु आहे. त्यातच नाना पेठेत काही दिवसांपूर्वी आंदेकर टोळीतील (Andekar Gang) सराईतांनी दोघांवर शस्त्राने वार केले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. त्याच आंदोकर टोळीतील आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीतील तीन अल्पवयीन मुलांनादेखील ताब्यात घेण्यात आलं आहे.



आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आण्णा राणोजी आंदेकर, कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर (वय 33), तुषार निलंजय वाडेकर (वय 24), स्वराज निलंजय वाडेकर (वय 20), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान यांना अटक करण्यात आली आहे. तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सगळ्यांविरोधात हल्ल्यात जखमी झालेल्या 29 वर्षीय निखिल आखाडे गंभीर झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. निखिलचा मित्र अनिकेत दुधभाते (वय 27 ) जखमी झाला आहे. दुधभाते याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना 7 आक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


अधिक माहितीनुसार, नाना पेठेत दोन टोळ्यांमध्ये हाणामारी झाली होती. आंदेकर टोळी आणि सूरज ठोंबरे टोळी अशी या टोळींची नावं होती. जखमी झालेला आखाडे आणि त्याचा मित्र दुधभाते  हे गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे निघाले होते. यावेळी आंदेकर टोळीने दोघांवर हल्ला केला या हल्ल्यात आखाडेचा मृत्यू झाला. दोन्ही टोळींमध्ये अनेक वर्षांपासून वैर आहे. दोन महिन्यांपूर्वी आमची शाब्दिक चकमक झाली होती आणि त्यावेळी त्यांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती, असं अनिकेतने सांगितलं आहे. 


कोयता गँग आणि टोळ्यांची दहशत कायम...


पुण्यात मोठ्या प्रमाणात कोयता गँग आणि पुण्यातील टोळ्या दहशत माजवताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनीदेखील आता त्यांच्याविरोधात अॅक्शन प्लॅन आखला आहे. पोलीस या टोळीने जिथे दहशत माजवली त्यात परिसरात घेऊन जात त्यांची नागरिकांसमोरच रस्त्यावर वरात काढताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवायला देखील सुरुवात केली आहे. त्यामार्फत अनेक गुन्हेगारांचा शोध घेणं सुरु आहे. आतापर्यंत किमान सात ते आठ वेळा कोयगा गँगची भररस्त्यात धिंड काढली आहे. तसेच यापुढेही या टोळीची धिंड काढण्यात येणार आहे. या टोळीत अल्पवयीन मुलांचादेखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 


इतर महत्वाची बातमी-