Navratri 2023 : 15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सावाला (Navratri 2023) सुरुवात होत असून, याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवासाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. चातुर्मासातील सर्वांत महत्त्वाच्या उत्सवांपैकी शारदीय नवरात्र विशेष महत्त्वाची मानली जात असून, महाराष्ट्रात देवीचा उत्सव फार मोठा आहे. त्यामुळे सगळीकडेच नवरात्रोत्सवाची रेलचेल पाहायला मिळत असते.  मात्र, धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्थानाच्या वतीने साजरा केल्या जाणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवासाची एक विशेष ओळख आहे. तर, याच तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 6 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, मंदिर समितीच्यावतीने 6 ते 30 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रौत्सव कालावधीत साजर्‍या केल्या जाणार्‍या विविध धार्मिक विधीचे वेळापत्रक जाहीर केल आहे. 


धार्मिक विधीचे वेळापत्रक 


6 ऑक्टोबर :  तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. 
15 ऑक्टोबर : पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी 12 वाजता घटस्थापना ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्री छबीना
16 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा व रात्री छबीना
17 ऑक्टोबर :  देवीची नित्योपचार पुजा व रात्री छबीना
18 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, रथ अलंकार महापूजा व रात्री छबीना
19 ऑक्टोबर : "ललिता पंचमी" देवीची पूजा, मुरली अलंकार महापुजा व रात्री छबीना
20 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्री छबीना
21 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्री छबीना
22 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, दुपारी 3 वाजता वैदिक होम व हवनास आरंभ, रात्री 8.10 वाजता पुर्णाहुती, रात्री छबीना  
23 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पुजा,  दुपारी 12 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन व रात्री  नगरहून येणारे पलंग व संत जानकोजी भगत बुन्हाणनगर येथून येणारे पालखीची मिरवणूक
24 ऑक्टोबर : विजयादशमी (दसरा) उषःकाली देवीची शिबिकारोहन, सिमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक, मंचकी निद्रा, शमीपुजन व सार्वत्रिक सिमोल्लंघन
28 ऑक्टोबर : कोजागिरी पौर्णिमा 
29 ऑक्टोबर : पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबीना व जोगवा 
30 ऑक्टोबर : देवीची नित्योपचार पूजा, अन्नदान महाप्रसाद व रात्री सोलापूरच्या काठयांसह छबीना.


अशी केली जाते तयारी...


विशेष म्हणजे नवरात्रनिमीत्त तुळजाभवानी मंदिराचा संपुर्ण परिसर धुवून स्वच्छ करण्या्त येतो. मंदिरातील व्दार,महाव्दारांना अंब्याच्या पानाचे तोरण व नाराळाचे फड बांधण्यात येतात. देवीची  सिंहासनावर प्रतिस्थापना ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रम केले जातात.


संबंधित बातम्या: 


Navratri 2023 : नवरात्रीमध्ये उपवास करणं किती फायदेशीर? आरोग्यावर काय परिणाम होईल?