सांगली : सांगलीतील शरद पवार (NCP Sharad Pawar)  गटाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil)  यांचे समर्थक असलेल्या काही माजी  नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मुंबईत काल सायंकाळी  भेट  घेतलीय. यामुळे सांगलीत (Sangli News)  अजित पवार गट  जयंत पाटील यांना पुन्हा देणार धक्का का अशी चर्चांना उधाण आले आहे.

  


 जयंत पाटील गटाचे हे माजी नगरसेवक लवकरच अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा देखील होत असून लवकरच सांगलीत अजित पवारांच्या हस्ते प्रवेश कार्यक्रम घेण्याचे नियोजन अजित पवार गटाकडून होतं आहे. भेटीला गेलेल्या माजी नगरसेवकाकडून मात्र शहराच्या विकासासाठी निधीबाबत चर्चा करण्यासाठी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेलो असल्याचे  स्पष्टीकरण देण्यात येतेय. 


अजित पवारांची भेट कोणत्या आमदारांनी घेतली


सांगलीतील जयंत पाटील यांचे समर्थक असलेले माजी नगरसेवक अजित पवार गटात जाण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांचे जवळच्या  असलेल्या काही माजी   नगरसेवकानीं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत काल सायंकाळी  भेट घेतली.लवकरच जयंत पाटील गटाचे हे माजी नगरसेवक अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र भेटीला गेलेल्या माजी नगरसेवकाकडून  शहराच्या विकासासाठी निधीबाबत चर्चा करण्यासाठी गेलो असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येतंय. मात्र या जर नगरसेवकांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर  जयंत पाटील यांना हा  मोठा धक्का असेल. दरम्यान, या नगरसेवकांचा अजित पवार गटात लवकरच प्रवेश होईल अशी चर्चा आहे.राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक विष्णू माने तसेच भाजप नेते सुरेश आवटी, माजी उपमहापौर आनंदा देवमाने असे भेट घेतलेल्या माजी नगरसेवकाची नावे आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.पद्माकर जगदाळे उपस्थित होते. 


पुढच्या महिन्यात अजित पवारांचा सांगली जिल्हा दौरा


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यात पक्षप्रवेशासह कुपवाड येथील मदन पाटील क्रीडांगण व खो-खो स्पर्धांचे उद्घाटनही होणार आहे. विटा येथेही पक्षाच्या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती असणार आहे. त्यांच्या दौऱ्यात माजी महापौर, माजी नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी शक्यता होती. पक्षवाढीच्या दृष्टीने पुढील महिन्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या सांगली दौऱ्याला मोठे महत्त्व असणार आहे.


हे ही वाचा :


राष्ट्रवादी कुणाची? घड्याळ कोणाला मिळणार? नेत्यांची धाकधूक वाढली, निवडणूक आयोगाचा निकाल येणार कुठल्याही क्षणी