मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात (NCP MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांसमोर बंद दाराआड झालेल्या कालच्या सुनावणीत याचिका एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आल्या आहेत. एकूण पाच  याचिका दोन  गटांत एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुढील सुनावणीत साक्षीदार निश्चित केले जाणार आहे. 18 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.  


 विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागणार आहे. राहुल नार्वेकर सात दिवसांचा अधिकचा वेळ मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी पूर्वी निर्णय घेण्याचे राहुल नार्वेकर यांना निर्देश देण्यात आले आहे.  राहुल नार्वेकर 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करणार आणि त्यानंतर सुनावणीचा निकाल राखून ठेवणार आहे.   राष्ट्रवादीची सुनावणी शिवसेनेच्या सुनावणीपेक्षा वेगळी असल्याने अधिकचा वेळ लागत असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे. 


अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करावे, शरद पवार गटाची मागणी 


राष्ट्रवादी आमदार अपात्रतेसंदर्भात  शेड्युल 10 चा सेक्शन 2 (A) अंतर्गत राष्ट्रवादीची सुनावणी घेण्यात येणार आहे.  2 A अंतर्गत अजित पवार गटावर स्वतःहून राजकीय पक्ष सोडल्याने त्यांना अपात्र करावं अशी शरद पवार गटाची मागणी आहे. 


 विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार?


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल दिला. त्यांनी भरत गोगावले यांचा व्हीप वैध ठरवत एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला. तसेच त्यांनी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे दोन्हीही आमदार पात्र असल्याचा निकाल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.  


निवडणूक आयोगाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार?


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई ही सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्हाचा निकाल हा आयोगात देखील प्रलंबित आहे. पण तो निकाल कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान राजकीय वर्तुळात हा निकाल जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या, पण अद्यापही हा निकाल लागलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची धाकधुक सध्या वाढलेली आहे.  


हे ही वाचा :


Rahul Narwekar : माझं कुठं चुकलं हे ठाकरेंनी सांगितलंच नाही, नुसता शिव्याशाप दिल्या, हे तर दसरा मेळाव्याचं भाषण;राहुल नार्वेकराचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर