Mahaashtra NCP Crisis:  सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

   थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.   पक्ष पातळीवरती पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी अजित पवारांनी  सुरुवात केली आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक झाली.  तब्बल एक तास ही चर्चा सुरू होती. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील या बैठकीला उपस्थित होते. संभाव्य कायदेशीर पेचप्रसंग आणि तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. काल शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल आणि  सुनील तटकरे यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार न पाडल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केली होती. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्षपदावर नेमल्यानंतर आता सुनिल तटकरे यांना राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय खजिनदारपदाची आणि राष्ट्रीय सरचिटणीस पदाचीही जबाबदारी देण्यात आली होती. 


 सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस


तर रात्री प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह नऊ जणांची शपथविधी ही बेकायदेशीर असून त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले होते.  त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी  सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्याची शरद पवारांकडे  शिफारस केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या,  सुनील तटकरे आणि  प्रफुल्ल पटेल यांनी 2 जुलै 2023 रोजी पक्षाच्या घटना आणि नियमांचे थेट उल्लंघन करून पक्षाचे सदस्यत्व सोडले आणि अपात्र ठरले आहेत. माझी विनंती आहे की शरद पवार साहेब यांना तात्काळ कारवाई करून भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेची याचिका संसद सदस्यांविरुद्ध सक्षम प्राधिकरणासमोर दाखल करतील 


पवार कुटुंबियांच्या निकवर्तीयांपैकी असलेले नेते म्हणजे सुनील तटकरे


पवार कुटुंबियांच्या निकवर्तीयांपैकी एक असलेले नेते म्हणजे सुनील तटकरे.  सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत संघटना पातळीवर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. . शरद पवार यांनी 1999 साली  राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडल्यानंतर सुनील तटकरे हे त्यांच्यासोबत गेले. सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत. तर पुत्र अनिकेत तटकरे  देखील राजकरणात सक्रिय आहे. तटकरे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. 


 हे ही वाचा :


Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री, अदिती तटकरेंनी शपथ घेतली