परभणी : आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर चिखल टाकून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच परभणीत जिंतूरचे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनीही नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून मारहाण केली आहे.
याप्रकरणी जिंतूरचे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर नगर परिषदेचे कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांना आज आमदार विजय भांबळे यांनी त्यांच्या घरी बोलावले होते.
यावेळी त्यांच्या घरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगराध्यक्ष यांचे पती कपिल फारुकी यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विजय भांबळे यांनी तुम्ही काम बरोबर का करत नाहीत असे म्हणत वाद घातला. वाद वाढल्यानंतर भांबळे यांनी तळेकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली.
महत्वाचे म्हणजे मुख्याधिकाऱ्यांसमोर हा प्रकार झाला. यानंतर कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आधीही आमदार विजय भांबळे आणि जिंतूर येथील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाद, शिवीगाळ करण्याची प्रकरणे झाली आहेत. मात्र अशा प्रकरणात पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या आमदाराची कर्मचाऱ्याला घरी बोलावून मारहाण, आमदार विजय भांबळेंविरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Jul 2019 09:44 AM (IST)
यावेळी त्यांच्या घरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगराध्यक्ष यांचे पती कपिल फारुकी यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विजय भांबळे यांनी तुम्ही काम बरोबर का करत नाहीत असे म्हणत वाद घातला. वाद वाढल्यानंतर भांबळे यांनी तळेकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -