Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 जुलै 2019 | शनिवार


अर्थसंकल्पानंतर इंधनदरवाढ पेट्रोल, डिझेलच्या दरात दोन रुपयांनी वाढ, सोन्यालाही झळाळी, स्वस्त घर खरेदीवर साडेतीन लाखांची सूट



अर्थसंकल्पामुळे मध्यमवर्गीय नाराज, टॅक्स स्लॅबमध्ये जैसे थे, कररचनेत बदल केल्यानं कॉर्पोरेट जगताला दिलासा

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, कायदेशीर तरतुदी लक्षात घेतल्या नसल्याचा याचिकाकर्त्याचा दावा

मुंबई आणि परिसरात जोरदार पावसाला सुरुवात, जोगेश्वरीजवळ भाजीचा ट्रक उलटून अपघात, एकाचा मृत्यू, वाहतूकीचीही कोंडी

अधिकाऱ्यावर चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, कणकवली न्यायालयाचा निर्णय

तिवरे धरणफुटीला जबाबदार खेकड्यांवर कारवाई करा, जलसंधारण मत्र्यांच्या अजब दाव्याचा निषेध करताना जितेंद्र आव्हाडांची मागणी

तुम्हाला माणसाच्या आयुष्याची काहीच किंमत नाही का?, मुंबईकरांच्या सुरक्षेच्या उपायांवरुन हायकोर्टाने म्हाडाला झापलं

गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट प्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत, आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता

पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची घोषणा

पाकिस्तानचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नेट रनरेटचं समीकरण पाकिस्तानच्या आवाक्यातून निसटलं