Jitendra Awhad Anticipatory Bail : मला अजिबात आनंद नाही, 354 चा गुन्हा विनाकारण लावण्यात आला आहे. हा गुन्हा माझ्या जिव्हारी लागला आहे. मला अडकवण्यासाठी कट आखण्यात आला आहे. त्या महिलेला मी वेळीच बाजूलं केलं होतं, म्हणून प्रकरण तितकं वाढलं नाही. ती महिला त्या हेतूनेच माझ्याकडे आली होती. माझ्यावर आणखी एखादा गुन्हा दाखल करण्याता आला असता. तुम्हीही तो संपूर्ण व्हिडीओ पाहा, त्यावेळी तुम्हाला माझ्या विरोधात व्यावस्थित कट आखण्यात आल्याचं दिसून येईल, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. जामीन मिळाल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
354 चा गुन्हा माझ्या जिव्हारी लागला आहे. जर व्हिडिओ तुम्ही नीट बघितला असेल तर त्या बाई समोरून चालत आल्या, जर बाजूला केले नसते तर त्या अंगावर आल्या असत्या. नशीब मी त्यांना बाजूला केले, नाही तर काय घडले असते माहीत नाही. राजकीय षडयंत्र होते हे, इतके मोठे राजकीय षडयंत्र करायची गरज काय? फक्त वरून दबाव म्हणून कोणतेही गुन्हे दाखल करायचे ? पोलीस एकच बोलतात, वरून दबाव आहे. हा वरून दबाव कोण आणतो? शिपायापासून सीपीपर्यंत सर्व एकच सांगतात, वरून दबाव आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
या महाराष्ट्रात याआधी असं कधी झाले नव्हते. यात शकुनी कोण आहे माहीत नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आमदारकीच्या राजीनाम्यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, 'माझी अस्वस्थता अजूनही शांत झालेली नाही, माझ्या चेहऱ्यावर कुठे तरी दिसते आहे का? राजीनाम्यावर मी अजूनही ठाम आहे.' आता माझ्या विरोधात गुन्ह्यांची मालिका निघेल. पण मला हे आवडले नाही, ज्या लोकांसोबत मी आयुष्यभर बाजूला उभे राहून राजकारण केले, त्यांच्यासाठी मी विधान भवनात भाषण केले, आणि त्यांनी असे करावे, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मुख्यमंत्री जिथे उभे होते, तिथे आमची नगरसेविका उभी होती. तिला नको तिथे हात लावण्यात आला, पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पोलिसांना आम्ही तो दिला, पण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, माझ्या वेळी जी तत्परता दाखवली ती यावेळी का नाही दाखवली? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
आव्हाडांना जामीन-
विनयभंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने आव्हाड यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: