Kolhapur News : ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने कोल्हापूर शहरामधून होणाऱ्या ऊस वाहतुकीने वाहनांना चांगलीच अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेकडून ऊस आणि अवजड वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. हंगाम संपेपर्यंत हे बदल कायम राहतील. 


बदलण्यात आलेले मार्ग पुढीलप्रमाणे आहेत 



  • तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण सदर बाजार, धैर्यप्रसाद हॉल चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय, कसबा बावडा मेन रोड, राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ. 

  • बालिंगाकडून फुलेवाडी रंकाळा टॉवर, रंकाळा स्टँड, गंगावेश डावीकडे वळण छत्रपती शिवाजी महाराज पुल उजवीकडे वळण सीपीआर सिग्नल चौक- महावीर कॉलेज कसबा बावडा मेन रोड, राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ. 

  • भोगावती व कळंब्याकडून पुईखडी नवीन वाशी नाका, उजवे वळण रिंग रोड, कळंबा संभाजीनगर रिंगरोड- सायबर चौक  हायवे कॅटिन डावे वळण उड्डाण पूल ताराराणी पुतळा सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल पोलिस अधीक्षक कार्यालय कसबा बावडा, राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्थ होतील.

  • डी. वाय. पाटील कारखाना व कुडित्रे कारखान्याकडे तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण – सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल, हेडपोस्ट ऑफीस महावीर कॉलेज, सीपीआर सिग्नल उजवे वळण शिवाजी पूल चौक – गंगावेश, उजवे वळण रंकाळा स्टॅन्ड- रंकाळा टॉवर फुलेवाडी डी. वाय. पाटील कारखाना व कुडित्रे डावे वळण कारखान्याकडे मार्गस्थ होतील.

  • बिद्री कारखान्याकडे तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा डावे वळण उड्डाण पूल हायवे कॅन्टीन चौक- सायबर चौक डावे वळण रिंगरोड मार्गे संभाजीनगर डावे वळण कळंबा बिद्री कारखान्याकडे मार्गस्थ होतील.

  • भोगावती कारखान्याकडे तावडे हॉटेल कडून ताराराणी पुतळा डावे वळण उड्डाण पुल हायवे कॅन्टीन सायबर चौक डावे वळण रिंग रोड मार्गे संभाजीनगर डावे वळण कळंबा सईमंदिर उजवे वळण रिंग रोड नवीन वाशी नाका डावे वळण – भोगावती कारखान्याकडे मार्गस्थ.

  • दत्त दालमिया कारखान्याकडे तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण, सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल – हेडपोस्ट ऑफीस महावीर कॉलेज सीपीआर सिग्नल उजवे वळण छत्रपती शिवाजी महाराज पूल, दत्त दालमिया कारखान्याकडे मार्गस्थ.

  • फुलेवाडी – रंकाळा टॉवर रंकाळा स्टँड गंगावेश डावीकडे वळण छ. शिवाजी पूल उजवीकडे वळण सीपीआर सिग्नल चौक महावीर कॉलेज कसबा बावडा – राजाराम साखर कारखान्याकडे येणारी व जाणारी ऊस वाहतूक रात्री 12 वा. ते सकाळी 6 पर्यंत करणेत यावी. इतर वेळेमध्ये त्यांना प्रतिबंध आहे.


इतर महत्वाच्या बातम्या