Samruddhi Mahamarg Thane Accident : 'हा शेतकऱ्यांचा शाप आहे', असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या गर्डर अपघातावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारने समृद्धी महामार्गसाठी घेतल्या त्या शेतकऱ्यांचा शाप लागला असल्याचं म्हणत राऊतांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तर 'राजकारणी हा विषय कधी गांभीर्याने घेणार आहेत? असा सवाल विचारत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ठाण्यातील गर्डर कोसळ्याच्या घटनेवर माझाला प्रतिक्रिया दिली आहे.


शहापूर ठाणे (Thane) येथे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु असताना गर्डर कोसळून अनेकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये जवळपास 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. शाहपूर सरलांबे येथे गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यावर आता विरोधकांकडून पुन्हा एकदा सरकावर निशाणा साधण्यात येत आहे. 


यावर चर्चा होणं गरजेचं आहे - सुप्रिया सुळे


दरम्यान अशा घटनांची जबाबदारी कोणतही सरकार घेणार नाही असा दावा देखील सुप्रिया सुळेंनी माझाला प्रतिक्रिया देताना केला आहे.  यावर बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, "सरकार मृतांच्या नातेवाईकांना मदत करतं पण मदत करुन गेलेला माणूस परत येत नाही. तर यावर संसदेत आणि विधानभवनात सविस्तर चर्चा व्हायलाच हवी." तर या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे. एवढी अद्यायावत यंत्रणा असताना हा अपघात झालाच कसा असा सवाल सुप्रिया सुळे यांनी माझाच्या माध्यमातून केला आहे.


समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु असताना रात्रीच्या वेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे. माहितीनुसार,  गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. तर पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी  दोन 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 


हेही वाचा : 


Samruddhi Mahamarg Thane : समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना ठाण्यात मोठी दुर्घटना, 17 जणांचा मृत्यू; आणखी सहा ते सात जण अडकल्याची माहिती