कोल्हापूर : शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस (Congress shiv ) या दोन्ही पक्षाला राष्ट्रवादी (Ncp) पक्ष खाऊन टाकणार आहे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या या वक्तव्यावर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांनी टोला लगावला आहे. "शिवसेनेच्या कोणालाही राष्ट्रवादीत घेतलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची ये- जा असते. त्यामुळे ताटात काय वाटीत काय? याबाबत चंद्रकांत दादांनी इतकं हळवं होण्याची गरज नाही, असा टोला हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. 


मध्यप्रदेशात घरा घरात वाईन पण...
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या सुपर मार्केटमधील वाईन विक्रीच्या निर्णयावरही चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यावरही हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना उत्तर दिले आहे. "सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय द्राक्ष उत्पादकांसाठी घेतला आहे. दारू बंदी प्रबोधन करूनच झाली पाहिजे. त्यासाठी लोकांनी मनावर घेतले पाहिजे. पक्षांनीही याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर भाजपकडून टीका होत आहे. परंतु, मध्यप्रदेशात घरा-घरात वाईन वाटली जाते तिथे भाजप काही बोलत नाही, असा टोला मंत्री मुश्रीफ यांनी लगावला आहे. 


दरम्यान, मास्कमुक्त महाराष्ट्र याबाबत बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, "अमेरिका आणि फ्रान्स हे देश मास्क मुक्त झाले आहेत. आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे यावर चर्चा झाली. परंतु, टास्क फोर्स बरोबर चर्चा करूनच यावर निर्णय घेतला जाईल. सध्यातरी हा निर्णय लगेच होईल असे वाटत नाही."


थकीत वीज बिल न भरल्यामुळे राज्यात विज तोडणी सुरू आहे. याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, "चालू बिल भरल्यानंतर वीज तोडणी केली जात नाही. बिल भरण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत. त्यामुळे योग्य आहे तेवढं तरी बिल भरलंच पाहिजे."


महत्त्वाच्या बातम्या :