सातारा : ज्या माणसाची योग्यता नाही, आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो? याचा जराही विचार करत नाही त्याच्यावर आपण काय बोलावं? सूर्याकडे बघून जर थुंकलं तर ती थुंकी आपल्यावरचं पडणार ना? अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रकरणावर दिली आहे. ते सातारा येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. च्याही पक्षाच्या वरीष्ठांना या प्रकणाबद्दल उत्तर देता देता तोंडाला फेस आला असल्याचेही अजित पवार म्हणाले.

Continues below advertisement

काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार?

याविषयी दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडल्या आहेत. पवार साहेबांना उभा भारत देश ओळखतो. कुठलही संकट येवो, गारपीट, दुष्काळ, भूकंप किंवा अन्य.. पवार साहेबांना बसवत नाही. उमेदीच्या काळात तर ते फिरलेच. पण, या वयातही ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. ज्या माणसाची योग्यता नाही. आपण काय बोलतो, कुणाबद्दल बोलतो? याचा जराही विचार करत नाही. सूर्याकडे बघून जर थुंकलं तर ती थुंकी आपल्याचं अंगावर पडणार ना?, अशी तिखट प्रतिक्रिया पवार यांनी दिली. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना : गोपीचंद पडळकर

Continues below advertisement

नको तितकं महत्व दिल्याने हे प्रकार होतात जी व्यक्ती बोलली त्यांचा स्वभावचं तसा आहे, पूर्वी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषय देखील बोलले होते. एखाद्याला नको तितकं महत्व दिल्याने त्याला आकाशही ठेंगणं वाटतं, त्यातलाच हा प्रकार आहे. बारामतीकरांनी सर्वांची डिपॉजिट जशी जप्त केली तसं याचही डिपॉजिट जप्त केलं यावरुन जनाधार त्यांच्या किती मागे आहे, हे राज्यानं ओळखलं आहे. निवडणूक काळात ज्या पद्धतीने पवार साहेबांनी प्रचार केला. त्यात सातरची सभा देशभर व्हायरल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पवार साहेबांचे कौतुक केलंय. त्यामुळे अशा गोष्टींकडे आम्ही लक्ष देत नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार शेवटी म्हणाले.

ज्यांना लोकांनी बाजूला केलं त्यांची आपण दखल का घ्यायची? : शरद पवार

गोपीचंद पडळकर यांची दखल घेण्याची आता गरज नाही. पडळकरांना त्या त्या वेळी लोकांनी उत्तर दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले. बारामती लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ते आमच्याविरोधात लढले तर त्यांच डिपॉझिट जप्त झालं. सांगली लोकसभेतही त्यांचं काही झालं नाही. लोकांनी त्यांना ज्या त्या वेळी उत्तर देत बाजूला केलं आहे, आपण त्यांची दखल का घ्यायची, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते.

Ajit Pawar PC | काहीही झालं तरी राज्याला या संकटातून बाहेर काढायचं : अजित पवार