Jitendra Awhad News: राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)  यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj) डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते हे सांगताना आव्हाडांनी औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं' असं म्हणाले. जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विधानसभेत संभाजी महाराजांबद्दल (Sambhaji maharaj) केलेल्या वक्तव्यानंतर वाद सुरु झाला. या वादावर बोलताना ठाण्यातील पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाडांनी स्वतःच वाद ओढवून घेतला.


संभाजी महाराज एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही


जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांचे डोळे फोडले त्याठिकाणी विष्णूचे मंदिर होते. औरंगजेब क्रूर आणि हिंदू द्वेष्टा असता तर विष्णूचं मंदिरही तोडलं असतं, असं आव्हाड म्हणाले.  जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, संभाजी महाराजांच्या बद्दलचा वाद निष्कारण काढला गेलाय. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज गादीवर बसले.  मराठा व्यापक संकल्पना होती. रयतेच्या राज्याचे वारसदार होते संभाजी महाराज . यामुळे ते एका विशिष्ट धर्मांतरास बाहेर पडले अशी एकही नोंद नाही. इतिहासकारांनी त्यांच्या बद्दल चांगले लिहून ठेवले आहे. स्त्रीप्रधान संस्कृतीला मानणारे संभाजी महाराज मोठे अभ्यासक होते. कुठल्या इतिहासकाराने त्यांना धर्मवीर म्हणले नाही. जे शिवाजी महाराजांनी केले तेच पुढे संभाजी महाराजांनी केले, असं आव्हाड म्हणाले, 


आव्हाडांनी म्हटलं की, सहा सुनेरी पानं यांत जे काही लिहिलंय ते वाचून पुन्हा वाद नाही निर्माण करायचा. सावरकरांनी संभाजी महाराजांबद्दल “नाकारतां पुत्र, त्यांना मदिराचे व्यसन होते” असं लिहून ठेवलं.  गोळवलकर यांनी “खंडोज्जी बल्लाळ यांच्या स्त्रीयांवर संभाजी महाराजांची वाईट नजर होती” असं लिहून ठेवलंय, असंही आव्हाडांनी सांगितलं. 


आव्हाडांनी म्हटलं की,संभाजी महाराजांची माहिती कोणी दिली यांचे देखील पुरावे आहेत.  अजित पवार यांना म्हणायचे वेगळे होते पण त्यांचा टोन वेगळा होता.  मी जे सांगतोय ते सत्य अभ्यासू सांगतोय.  भाजपाने जे आंदोलन केले म्हणून हे सगळं बाहेर घेवून आलोय.  अजित पवार संभाजी महाराजांच्या विरोधात काहीच बोलले नाही.  महापुरुषांना विशिष्ट धर्माचे लेबल लावायचे आणि बाजारात विकायला आणायचे. मराठ्यांबद्दल इतकं वाईट लिहिलंय त्या बद्दल आतापर्यंत का कोणी बोलले नाही, असंही आव्हाड म्हणाले.


नंतर सारवासारव करत आव्हाड म्हणतात, औरंगजेब क्रूरच होता...


पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन आव्हाडांवर टीका झाल्यानंतर त्यांनी आपलं वक्तव्यावर सारवासारव केली.  निष्कारण धर्माची जोड द्यायची हे बरोबर नाही. तुळापूरला औरंगजेब कधीच गेला नव्हता.  औरंगजेब किती क्रूर होता हे इतिहासांत लिहून ठेवलंय. त्याने भावाला वडिलांना मारले आणि गादीवर बसला. औरंगजेब क्रूरच होताच, असं आव्हाड म्हणाले.   क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांना कुठे मारलं यांचे पुरावे नाहीत. स्वतःच्या राज्य रचने करता औरंगजेब कोणालाही सोडत नव्हता. पण त्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही, असंही ते म्हणाले. 


Video: नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड- पाहा व्हिडीओ