NCP Eknath Khadse On BJP Chandrakant Patil : भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil BJP) यांनी पाच ते दहा वर्षानंतर निवृत्ती घेणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) चंद्रकांत पाटलांना जोरदार टोला लगावला आहे. 'पाच दहा वर्षानंतर कशाला? आताच निवृत्ती घ्या' या शब्दात एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टोलेबाजी केली आहे. खडसे यांनी म्हटलं आहे की, चंद्रकांत पाटील यांचा पिंड राजकारणी नाही. ते विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. त्यांचा राजकारणाशी फारसा संबंध नव्हता. गेल्या काळात पक्षाने त्यांच्यावर मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र आता पक्षातल वातावरण त्यांना आवडलं नसावं आणि अशा वातावरणात पुढच्या काळात राजकारण अवघड आहे, असे त्यांच्या मनाला वाटलं असेल, त्यामुळे राजकारणापासून वेगळं होण्याचा विचार त्यांच्या मनात आला असेल, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे.


उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील एसएनडीटीमध्ये आयोजित कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चा सुरु आहे. यावेळी चंद्रकांत पाटलांनी 5 वर्षांनी निवृत्त होण्याच्या अनुषंगाने वक्तव्य केलं होतं.


धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या वादासंदर्भात म्हणाले...


पंकजा मुंडे यांनी रक्ताची नाती कधी संपत नसतात, असे मत धनंजय मुंडे यांच्याबाबत मत मांडलंय. यावरुन आगामी काळात पंकजा मुंढे राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा आहे. यासंदर्भात विचारलं असता एकनाथ खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी काहीतरी वक्तव्य केलं म्हणून सुतावरुन स्वर्ग गाठण्याची गरज नाही, राजकारणात नातं जोपासलं पाहिजे, त्यामुळे यातूनच ओघवत्या शब्दात पंकजा मुंडे या बोलल्या असाव्यात असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.


धुळ्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यकर्त्यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणाऱ्या कार्यकर्त्यांना घोषणबाजी करत विरोध केला, यावर एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली. दसरा मेळावा कोणाचा मोठा व्हायचा यावरुन 'उद्धव सेना' आणि 'शिंदे सेना' यामध्ये चुरस वाढली आहे, यातूनच या दोघांचे एकमेकांवर हल्ले, शाब्दिक हल्ले असले प्रकार सुरु आहेत, याच माध्यमातून धुळ्यातील घटना घडली असावी असे मत एकनाथ खडसेंनी व्यक्त केलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार? चंद्रकांत पाटलांचं 'ते' वक्तव्य खरं ठरणार? राजकीय वर्तुळात चर्चा


Eknath Khadse Exclusive : भाजपात जाण्याच्या चर्चा निरर्थक, राष्ट्रवादीने माझं पुनरुज्जीवन केलंय