Maharashtra Jalgaon News: राष्ट्रवादीत बंडखोरी करत जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष झालेले संजय पवार (Sanjay Pawar) यांनी दैनिकात दिलेली जाहिरात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या या जाहिरातीत महाजनांसह शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे फोटो आहेत.
क्रिडामंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त संजय पवार यांनी दैनिकात एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेशदादा जैन यांचेही फोटो आहेत. पण या सर्वांच्या फोटोमध्ये अजितदादा पवार यांचा फोटो सर्वात मोठा छापण्यात आला आहे. आणि अजित पवारांच्या फोटोखाली 'जिवाभावाचा माणूस', असं लिहिण्यात आलं आहे.
पोस्टरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे फोटो आहेत. त्यांच्यासोबतच अजित पवारांचाही फोटो आहे. पण अजित पवारांचा फोटो आणि त्याखाली लिहिलेला मजकूर विशेष चर्चेचा विषय होत आहे. सगळ्यांचे फोटो लहान छापण्यात आले आहेत. मात्र अजित पवारांचा फोटो मोठा छापण्यात आला आहे. एवढंच नाहीतर त्यांच्या फोटोखाली 'जिवाभावाचा माणूस' असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
पाहा व्हिडीओ : Jalgaon : राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्याची जाहिरात, अजितदादा-शरद पवार-गिरीश महाजनांचा एकत्र फोटो
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच, त्यावेळी अजित पवार नॉट रिचेबल असल्याचंही बोललं जात होतं. सध्या मुख्यमंत्री पदी विराजमान असणारे एकनाथ शिंदे पदावरुन पायउतार होणार आणि त्यांनंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुख्यमंत्री होणार असं बोललं जात होतं. त्यानंतर शरद पवारांचं राजीनामा नाट्य रंगलं. मग महाविकास आघाडीत फूट पाडण्याच्या चर्चा. यासर्व राजकीय वर्तुळातील नाट्यमय घडामोडींमध्ये आता भाजप नेत्याच्या वाढदिवसाच्या जाहिरातीत शरद पवारांसह अजित पवारांचा फोटो दिसल्यानं राज्यात पुन्हा खळबळ माजली आहे.