नागपूर : नक्षलवाद्यांना (Naxalite) स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही, आदिवासी भागातील (Tribal Areas) ग्रामीण तरुण नक्षलवादाकडे यायला तयार नाही. परिणामी नक्षलवाद्यांना नव्या भरतीची (रिक्रुटमेंट) अडचण निर्माण झाली आहे.  त्यामुळेच शहरी नक्षलवाद्यांनी आता मोठ्या शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये लक्ष केंद्रित करत नक्षलवादासाठी नव्या भरतीची मोहीम सुरू केल्याचे समोर आले आहेत. महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नागपूर (Nagpur), नाशिक (Nashik) आणि गोंदिया (Gondia) या पाच शहरातून नक्षलवाद्यांनी झोपडपट्ट्यामधून तरुणांचे ब्रेन वॉश करत त्यांना नक्षलवादाकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे. 


पुण्यात संतोष शेलारने नुकतंच एटीएससमोर केलेले सरेंडर आणि पोलीस यंत्रणेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि गोंदिया या पाच शहरातून नक्षलवाद्यांनी झोपडपट्ट्यामधून तरुणांचे ब्रेन वॉश करत त्यांना नक्षलवादाकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समोर आले आहे. गरिबी, अशिक्षित, विविध शासकीय योजनांचे अपयश अशा मुद्द्यांवर तरुणांची माथी भडकवुन त्यांना नक्षलवादाकडे ओढले जात असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांचे नक्षलविरोधी अभियानाचे स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे, शहरी नक्षलवादाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी युनिटने 32 संघटनांवर विशेष लक्ष ठेवणे सुरू केल्याचे ही पाटील म्हणाले आहेत. 


पोलिसांचे आवाहन...


दरम्यान, राज्यातील तरुणांनी नक्षलवाद्यांच्या या अपप्रचाराला बळी पडू नये आणि नक्षलवादाकडे जाऊ नये असे आवाहन ही पोलिसांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधान सर्वोत्कृष्ट असून, देशातील सर्व समस्या सोडवण्याची ताकद त्या संविधानामध्ये आहे. त्यामुळे तरुणांनी भारतीय संविधानावर विश्वास ठेवावं असे मतही पोलिसांनी व्यक्त केले आहे. 


शहरी नक्षलवाद्यांचा वाढता धोका



  • नक्षलवाद्यांशी संबंधित काही गोपनीय डॉक्युमेंट्सनुसार राज्यातील पाच शहरं शहरी नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आहे.

  • मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि गोंदिया या शहरात नक्षलवाद्यांनी त्यांचा नेटवर्क मजबूत केल्याचे मान्य केले आहे.

  • या शहरातून शहरी नक्षलवादी झोपडपट्टीत राहणाऱ्या तरुणांना ब्रेन वॉशकरून नक्षलवादाकडे नेण्याचा प्रयत्न करत असल्याचेही समोर आले आहे.

  • गरीबी, अशिक्षण, आणि शासनाच्या विविध योजनांचा अपयश या मुद्द्यांवरून तरुणांचं ब्रेन वॉश केले जात आहे.

  • पुढे त्यांना छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये लढण्यासाठी पाठवले जाते.

  • यासाठी काम करणारे 34 संघटना पोलिसांच्या रडारवर असून, त्यांच्या कामावर करडी नजर ठेवली जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nagpur News : नक्षलवाद प्रतिबंध राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; नक्षल पीडितांचे युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश