Nawab Malik ED Arrested Live : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी
Nawab Malik ED Enquiry Live : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.
अंडरवर्ल्डशी संबंध, मनी लॉंड्रिग प्रकरणी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मलिकांची कस्टडी मिळावी अशी मागणी ईडीकडून न्यायालयात करण्यात आली. नुकतीच नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी सुनावण्यात आली आहे.
नवाब मलिकांना अटक केल्याच्या निषेधार्थ उद्या सकाळी दहा वाजता मंत्रालयाच्या परिसरात महाविकास आघाडीचे मंत्री आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर आता गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास मुंबईतील मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ महाविकास आघाडी पक्षाचे मंत्री, आमदार धरणे आंदोलनाला बसणार आहेत. तसंच शुक्रवारपासून राज्यभरात शांततेत आंदोलन केलं जाणार आहे.
मलिक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत असल्याने त्यांच्यावर ईडीने कारवाई केली असल्याचं राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. पीएमएलए कायदा अस्तित्वात नव्हता त्यावेळचे हे प्रकरण असून फक्त मलिकांचे तोंड बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचं ते म्हणाले.
1992 च्या एफआयआरबाबत 30 वर्षानंतर नवाब मलिकांचं नाव घेत त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. मलिक केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांविरोधात बोलतात म्हणून नवाब मलिकांचं तोंड बंद करण्यासाठी हे केलं जात आहे.
Maharashtra Nawab Malik : नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये केंद्रीय यंत्रणांकडून चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याची दिली माहिती दिली. शरद पवार यांनी संपुर्ण महविकास आघाडी मलीक कुटुंबासोबत असल्याचं आश्वासनं दिले आहे
ईडीनं नवाब मलिकांसाठी 14 दिवसांची कोठडी मागितली आहे. आता त्यावर सत्र न्यायालय काय निर्णय घेणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
Nawab Malik : नवाब मलिक यांचा राजीनामा झाला तर त्यांचा चार्ज हा हसन मुश्रीफ किंवा जिंतेद्र आव्हाड यांच्याकडे चार्ज देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॉंग्रेसचे नेते थोड्याच वेळात सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीकरता पोहोचणार आहेत. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सिल्व्हर ओकवर जात आहेत.
अजित पवार सिल्व्हर ओकवरती
थोड्याच वेळात अजित पवार सिल्व्हर ओकवरती पोहोचणार असल्याचे समजते. इतर मंत्री ही सिल्व्हर ओक या ठिकाणी पोहोचत आहेत. तिथे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक होईल. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्रित वर्षावर जातील.
Nawab Malik : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मोठे नेते मुंबईला येत आहेत. जयंत पाटील हे देखील त्यांचा आजचा दौरा पूर्ण करून मुंबईला येणार आहेत. आत्ता ते माळशिरसकडे निघाले आहेत, तेथून वेळापूर येथे बैठक होऊन पुढे इंदापूरकडे ते जाणार आहेत.
सकाळीच ईडी अधिकारी माझ्या घरी दाखल झाले. मला जबरदस्तीनं ईडी कार्यालयात आणलं. कोणत्या अधिकाराखाली ही कारवाई करत आहेत, याची माहितीही दिली नाही. अशी माहिती नवाब मलिकांनी कोर्टाला दिली आहे.
नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संध्याकाळी बैठक होणार आहे.
Nawab Malik : ईडीतर्फे अॅडिशनल सॉलिसिटर जनरल अनिल सिंह युक्तिवाद करणार आहे. अनिल सिंह कोर्टात हाजर झाले, बचावपक्षाचे वकिलही उपस्थित आहेत. नवाब मलिकांतर्फे जेष्ठ कायदेतज्ञ अमित देसाई युक्तिवाद करणार आहे. थोड्याच वेळात विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या 54 नंबरच्या कोर्टात नवाब मलिकांना हजर केलं जाणार आहे.
Nawab Malik : नवाब मलिकांना ईडीकडून अटक केल्यानंतर भाजपकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर परभणीत या अटकेचा भाजपकडून फटाके फोडून आनंद साजरा करण्यात येत आहे.
Nawab Malik : मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करणाऱ्या दाउदशी नवाब मलिक यांचे आर्थिक संबंध आहेत हे पुराव्यानिशी आता स्पष्ट झाला आहे. दाऊदचे संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर कुठल्या नेत्यांशी आहेत याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे
नवाब मलिकांच्या अटकेनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे.
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची फोनवरून चर्चा झाली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.
Nawab Malik Arrested : राष्ट्रवादीच्या कार्यालयात वरिष्ठ मंत्र्यांची मंत्रालयात बैठक सुरु आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, राजेश टोपे उपस्थित आहे. नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणी चर्चा सुरु आहे.
Nawab Malik : नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसकडून ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे.
Nawab Malik : नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसकडून ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे.
Nawab Malik : नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसकडून ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे.
Nawab Malik : नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेसकडून ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे.
Balasaheb Thorat On ED : नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. तपास यंत्रणांचा राजकारणासाठी वापर; काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
Nawab Malik : नोटीस न पाठवता मंत्र्यांना ताब्यात घेणं हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची टीका राष्ट्रावदीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
Jayant Patil on Nawab Malik : नवाब मलिक यांच्यावरील कारवाई म्हणजे सत्तेच्या दुरुपयोगाचा अजून एक प्रकार आहे. जाणीवपूर्वक नवाब मलिक यांच्यावर राग काढण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
Nawab Malik : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतले असल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले.
Sanjay Raut on Nawab Malik : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडी चौकशी करण्यात येत असून याबाबत बोलताना 20 वर्षांनी चौकशी का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
आज सकाळी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर नवाब मलिक हे ईडी अधिकाऱ्यांसह 7-7.30 वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयात गेले.
पार्श्वभूमी
Nawab Malik ED Enquiry Live : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी नेल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले असल्याचे वृत्त आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्याप्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ईडीने समन्स पाठवले होते.
ईडी अधिकाऱ्यांचे एक पथक आज सकाळी पाच वाजताच नवाब मलिक यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर जवळपास दोन तास चर्चा सुरू होती. त्यानंतर सकाळी सात वाजता नवाब मलिक यांनी स्वत: हून ईडी कार्यालयात चौकशीसाठी येत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर ते ईडी अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात दाखल झाले अशी माहिती सूत्रांनी दिली.
प्रकरण काय?
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
(Nawab Malik ED Enquiry Live Updates allegations against Maharashtra Minister connection with Dawood Ibrahim money Laundering NCPs Sharad Pawar Sanjay Raut attacks on BJP)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -