Nagpur: नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी असून मुस्लिमांना किंवा इतर धर्मियांना प्रवेश देऊ नका अशी भूमिका आज विश्व हिंदू परिषद नागपुरात पत्रकार परिषदेत मांडणार आहे .गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा .येणाऱ्याला टिळा लावावा तसेच देवीची पूजा करायला लावा अशा नियम व अटी आज विश्व हिंदू परिषदेकडून केल्या जाणार आहेत .बजरंग दल आणि विहिपचे कार्यकर्ते गरबास्थळी यावर लक्ष ठेवून असणार आहेत . दरम्यान यावर राज्याचे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे . गरबा आयोजन करणारी समिती अटी शर्ती टाकू शकते तो त्यांचा अधिकार आहे .कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे का ? यावरच गरबा आयोजन समितीला निर्णय करायचा असतो, असं मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय .

Continues below advertisement


गरबा फक्त हिंदूंपुरता ; विश्व हिंदू परिषदेची भूमिका


नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने बजरंग दलाने गरबा कार्यक्रमांसाठी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केले आहे . नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठी आहे .मुसलमान किंवा इतर धर्मियांना यात प्रवेश देऊ नका अशी भूमिका आज विश्व हिंदू परिषद नागपूर मध्ये पत्रकार परिषदेत मांडणार आहे .दरवर्षीप्रमाणे नवरात्र सुरू होण्यापूर्वी विश्व हिंदू परिषद हे पत्रकार परिषद घेणार आहे .आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड बघून प्रवेश द्यावा, येणाऱ्या ला टिळा लावावा, देवीची पूजा करायला लावा ..अशा अटी शर्ती विश्व हिंदू परिषदेने घातल्या आहेत . या वेळी बजरंग दल आणि विहीपचे कार्यकर्ते गरबास्थळांवर लक्ष ठेवून राहणार आहे . गरबा भगवतीला प्रसन्न करण्यासाठीची आराधना आहे .गरबा नृत्य नसून देवीला प्रसन्न करण्यासाठी खेळला जातो .ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरबा प्रवेश देऊ नये .अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने सर्व गरबा आयोजकांना निवेदन देत मांडले आहे . 


पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया


विश्व हिंदू परिषदेच्या या भूमिकेवर नागपूरचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे . ते म्हणाले,  गरबा आयोजन करताना गरबा आयोजन समिती अटी शर्ती टाकू शकते .तो त्यांचा अधिकार आहे .समितीने काय अटी शर्ती ठेवल्या आणि त्या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे का ?या परवानगी वरच गरबायोजन समितीला निर्णय करायचा असतो असं बावनकुळे म्हणालेत .